ब्रेकिंग न्युज:फैजपुरात मोठी कार्यवाही, अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी चार हजाराची लाच घेताना फैजपूर पोलिसस्टेशन मधील तिन पोलिस ताब्यात
ब्रेकिंग न्युज:फैजपुरात मोठी कार्यवाही, अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी चार हजाराची लाच घेताना फैजपूर पोलिसस्टेशन मधील तिन पोलिस ताब्यात
लेवाजगत न्युज फैजपूर: अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी चार हजाराची लाच घेताना फैजपूर पोलिसस्टेशन मधील तिन पोलिसांना आज दुपारी पोलिसस्टेशन मधेच लाच घेताना रंगेहात अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.तक्रारदार पाडळसे,ता. यावल येथील रहिवासी असून यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे हेमंत वसंत सांगळे, किरण अनिल चाटे, यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४,०००/रु. प्रमाणे लाचेची मागणी केल्याबाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आज तक्रार देवून फैजपुर पोलीस स्टेशन येथे जावून वरील दोन्ही आरोपीतांची भेट घेण्यास गेले असता त्यांना हेमंत वसंत सांगळे हे भेटले त्यांनी तक्रारदार यांचेकडे कामाची व पैशाची बोलणी करून त्यांचे मोबाईल फोनवरून किरण अनिल चाटे यांना फोन करून तक्रारदार हे देत असलेल्या पैशांबद्दल बोलणी करून किती पैसे घ्यायचे याबाबत स्वतः बोलणी करून तक्रारदार यांचेकडे फोन देवून तक्रारदार व चाटे यांचे बोलणे करून दिले तसेच चाटे यांनी त्यांचे फोनवरून सांगळे यांच्या फोनवर बोलून लाचेच्या रक्कमेत तडजोड करून सदर लाच रक्कम सांगळे यांचेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सांगळे यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी व चाटे यांचे साठी ३,०००/- रुपये लाचेची मागणी करून पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेतील महेश ईश्वर वंजारी या अंमलदारांसाठी १,०००/- रु. अशी एकुण दरमहा ४,००० / रु. प्रमाणे लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम सांगळे यांनी पंचासमक्ष स्वतः स्विकारून यांचेजवळ दिली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत