गीतांजली एक्सप्रेस मधून पडल्याने तरुणी मृत्यू
गीतांजली एक्सप्रेस मधून पडल्याने तरुणी मृत्यू
लेवा जगत न्यूज भुसावळ- धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने तरुणीचा तरुण अंत झाला .पौर्णिमा इंगळे वय २६ हिचा जळगाव कडे येताना वाघूर नदी ते भादली दरम्यान गीतांजली एक्सप्रेस मधून पडल्याने मृत्यू झाला. पौर्णिमा दिनकर इंगळे वय २६ राहणार सुंदरखेड विजयनगर बुलढाणा ही गुरुवारी दुपारी गीतांजली एक्सप्रेसने मलकापूर ते जळगाव असा प्रवास करत होती दुपारी तीन वाजता वाघूर नदी ते भादली दरम्यान ते चालत्या गाडीतून तोल जाऊन अचानक खाली पडली या दुर्घटनेत डोक्याला जबर मार लागला पर्स मधील कागदपत्रे व मोबाईल वरून तिची ओळख पटली नंतर जळगाव कडून भुसावळ कडे जाणाऱ्या माल गाडीतून तिला भुसावळ नेण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत