विवाहितेची गळफास घेत आत्महत्या
विवाहितेची गळफास घेत आत्महत्या
लेवाजगत न्यूज रावेर- शहरातील वासुदेव नगरातील रहिवासी सिताराम काशिनाथ पाटील यांची मुलगी प्राजक्ता हिचे लग्न सात महिन्यापूर्वी उमरेड जिल्हा नागपूर येथील भरतकुमार पाटील यांच्याशी झाले होते. दोन महिन्यापूर्वी विवाहिता रावेर येथे वडिलांच्या घरी आली होती. गुरुवारी तिचे आई-वडील चिनावल येथे कामानिमित्त गेल्याने प्राजक्ता घरी एकटीच होती. तिने घराच्या वरील मजल्यावरील बेडरूम मध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. डी वाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी घटनास्थळी पाहणी केली.शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ एन डी महाजन यांनी केले. आत्महत्या पूर्वी विवाहितेने लिहून ठेवलेले चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत