Contact Banner

आमदार शिरसाट यांना अंधारेवरील टीका भोवली विनयभंगाचा आराेप, आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सुषमा अंधारे, अंबादास दानवेंची पोलिसात तक्रार

 

आमदार शिरसाट यांना अंधारेवरील टीका भोवली   विनयभंगाचा आराेप, आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सुषमा अंधारे, अंबादास दानवेंची पोलिसात तक्रार

आमदार शिरसाट यांना अंधारेवरील टीका भोवली 

विनयभंगाचा आराेप, आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सुषमा अंधारे, अंबादास दानवेंची पोलिसात तक्रार

वृत्तसंस्था मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार संजय शिरसाट यांना उद्धव सेनेेने घेरले आहे. २६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमधील एका मेळाव्यात शिरसाट यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेे. त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोग व परळी पोलिसात दाखल केली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली पाटील चाकणकर यांनी तातडीने तक्रारीची दखल घेऊन ४८ तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही स्थानिक पोलिसात तक्रार देऊन आ. शिरसाट यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, शिरसाट यांनी मात्र सर्व आरोपांचे खंडन केले आहे. ‘ सुषमा अंधारेंबद्दल मी एकही शब्द आक्षेपार्ह बोललो नाही. त्यामुळे काय चौकशी करायची ते कराच. आरोप सिद्ध झाल्यास मी तत्काळ आमदारकीचा राजीनामा देतो’, अशी भूमिका त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

  शिरसाटांचे प्रत्युत्तर : माझ्याविरोधात बोलाल तर याद राखा, आमदारकी गेली उडत

२६ मार्च रोजीच्या सभेतील

या वक्तव्यांवर आक्षेप

1 ‘ती बाई (सुषमा अंधारे) म्हणते सत्तार, भुमरे सगळेच माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत.’

2 अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत. अंबादासने सांगितलं ती बाई खूप डोक्याच्या वर झाली. सुभेदारीवर तिची व्यवस्था केली तर मातोश्रीवर तक्रार केली. तेथून फोन आला मग रामा इंटरनॅशनलमध्ये करावी लागली.

    पुढे काय? : आयोग करू शकेल पाचारण

शिरसाट मेळाव्यात नेमके काय बोलले त्याचे फुटेज पोलिस आयुक्तांकडून तपासले जाईल.

गुरुवारी सायंकाळपर्यंत त्याचा अहवाल

राज्य महिला आयोगाकडे पाठवला जाईल.

अहवाल, फुटेजची तपासणी आयोग करेल.शिरसाटांना चौकशीस बोलावले जाऊ शकते.

आरोपात तथ्य आढळले तर शिरसाटांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाईल.

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, तर गृह मंत्रालय भाजपकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबावाचा आरोप होऊ शकतो.

    शिरसाटांकडे ७२ कोटी आले कुठून, मुंबईत त्यांनी कुणासाठी फ्लॅट घेतला : रूपाली ठोंबरे

‘शिरसाट हे विकृत प्रवृत्तीचे नाव आहे. असे राजकारणी नेहमीच महिलांबद्दल असभ्य बोलतात. यातून त्यांची वैचारिक लायकी दिसते. मुळात शिरसाटांनी अंतरंगात डोकावून पाहत या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,’ असे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी दिले.

    1. संभाजीनगरमध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला आमदार संजय शिरसाट का अडकवू पाहत होते?

2. शिरसाटांकडे ७२ कोटी रुपये आले कुठून? त्यांना ब्लॅकमेल करून यातून ५ कोटी मागणारी कोण होती?

3.आठ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ७२ व्या मजल्यावर शिरसाट यांनी कुणासाठी कोट्यवधींचा फ्लॅट घेतला.

4. दोन महिन्यांपूर्वी शिरसाट यांना हार्टअटॅक आल्याने मुंबईला नेण्याचे नाटक झाले, ते प्रकरण नेमके काय?

     अंधारेंना बहिणीसारखे वागवले, शिव्यांचा अधिकार त्यांना कुणी दिला : शिरसाट

{ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारेंना मी घरी बोलावून बहीण म्हणून साडीचोळी दिली. हे नाते जपणारे आम्ही आहोत.

{ मी त्यांच्याबद्दल कधीच आक्षेपार्ह बोललो नाही. त्या मात्र आमचा उल्लेख ‘संज्या’, ‘घोडा’ असे करतात. हे त्यांच्या संस्कृतीला चालते का?

{ मी ‘लफडं’ हा शब्दप्रयोग घोटाळा म्हणून केला. मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना म्हणालो होतो की ‘तुम्ही काय लफडी केलीत. त्यामुळे अंधारे इकडे सभा घेत आहेत.’ यात चूक काय?

{ माझ्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही. चुकीचे

काही बोललो असल्याचे सिद्ध केल्यास मी

लगेच आमदारकीचा राजीनामा देईन.

{ सुषमा अंधारे हिंदू देवता, मराठा समाजाबद्दल, बाळासाहेब, उद्धव ठाकरेंबद्दलही यापूर्वी काय

काय बोलल्या याचे रेकॉर्डिंग आहे. .

{ ३८ वर्षांनंतर मुंबईत मी फ्लॅट घेऊ शकत नाही का? त्यावर आक्षेप असेल तर चौकशी करा किंवा ईएमआय भरून तुम्हीच तिथे राहा.

‘मातोश्री’वरून फोन आल्याने माझ्याविरोधात आंदोलन झाले. लढायचं तर समोरासमोर या. याद राखा, माझ्याविरोधात बोलाल तर मी त्याच भाषेत उत्तर देईन. मग आमदारकी गेली उडत.

संदर्भ-दिव्यमराठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.