Contact Banner

सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या दिंडीवर दगडफेक : पाळधीत संचारबंदी

 

Stone-throwing at Dindi:-Diagnosed-Communications

सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या दिंडीवर दगडफेक : पाळधीत संचारबंदी

लेवाजगत न्यूज धरणगाव - जळगाव येथून सप्तशृंगी गड येथे जाणार्‍या दिंडीवर दगडफेक करण्यात आल्याने रात्री पाळधीत काही काळ तणाव निर्माण झाला.

      याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव येथून सप्तशृंगी गड निघालेली दिंडी ही पाळधी गावाच्या जवळून जात असतांना दिंडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात दिंडीतील काही भाविक जखमी झाले. दरम्यान, पाळधी गावात याची माहिती मिळताच दुसर्‍या बाजूने देखील दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

   दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्रातून पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर, या धुमश्‍चक्रीत काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.