मेमू ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह आठ गुरांचा जागीच मृत्यू
मेमू ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह आठ गुरांचा जागीच मृत्यू
लेवाजगत न्यूज धुळे : धुळ्याकडून चाळीसगावाकडे येणाऱ्या 01310 मेमू ट्रेनखाली आल्याने आठ पाळीव जनावरांचा जागीच चिरडून मृत्यू झाला .तर गुराखीदेखील ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दुपारी सव्वा चार वाजता राजमाने स्थानकापासून काही अंतरावरील शिदवाडी गावाजवळ घडली. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (50, शिदवाडी) या गुराख्याचा मृत्यू झाला.
गुरांचा कळप रेल्वे रूळावर येताच दुर्घटना
सूत्रांच्या माहितीनुसार, धुळ्याकडून निघालेली मेमू ट्रेन 01310 ही चाळीसगावकडे निघाल्यानंतर खांबा किलोमीटर क्रमांक 344 जवळ गुरांचा कळप रेल्वे रूळावर आल्यानंतर मेमूची जबर धडक बसल्याने दोन गायी, दोन बैल, दोन म्हशी, वासरू, पारडू अशी 8 जनावरे कापली जावून मयत झाली, तर गुराखी राजेंद्र सूर्यवंशी हादेखील ठार झाला. मेमूच्या जबर धडकेने काही जनावरे रेल्वे रुळापासून लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वेखाली अडकली. अपघातानंतर सुमारे तासभर मेमू गाडी घटनास्थळी थांबून होती. रेल्वेखाली अडकलेली जनावरे काढल्यानंतर मेमू चाळीसगावकडे रवाना करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत