Contact Banner

चिरले येथील आई जगदंबा देवीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा

 

चिरले येथील आई जगदंबा देवीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा

चिरले येथील आई जगदंबा देवीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा 

उरण (सुनील ठाकूर ).सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील चिरले येथील भाजप जिल्हा उपाध्यक्ष  श्री नीलकंठ घरत .श्री शिवदास घरत .श्री सदानंद घरत .व समस्त घरत कुटुंबीयांचे आई जगदंबा देवीचे मंदिर आहे .या देवीचा उत्सव बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी विविध कार्यक्रमांनी  मोठ्या भक्ती भावाने साजरा झाला .

 सकाळी ८.३०वाजता आई जगदंबा देवीचा अभिषेक पार पडला .सकाळी 11 वाजता यज्ञ .होम हवन .आहुती कार्यक्रम  झाला .सकाळी ११.३० वाजता नवीन बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे ह.भ.प .पांडुरंग भोकाजी घरत यांच्या हस्ते उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला .दुपारी 12 वाजता महाआरती .साडे बारा वाजता महाप्रसाद .दुपारी २ वाजता आईचा जागर गोंधळ .पार पडला .सायंकाळी साडे पाच वाजता रामकृष्ण हरिपाठ मंडळ चिरले यांचा हरिपाठ झाला.सायंकाळी सात वाजता गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ गव्हाण कोपर गायिका सुप्रिया घरत .पखवाज तुषार घरत यांच्या सुश्राव्य भजनाने कार्यक्रमाची सांगता  झाली .

यावेळी भाजप जिल्हा उपाध्य्क्ष  निळकंठ घरत . शिवदास घरत . सदानंद घरत . रवींद्र घरत .कमलाकर घरत .विजय कडू .नागेश कडू .भरत घरत .मनोज घरत .संजय घरत .अनंत कडू .रामनाथ पाटील .संतोष भगत.जगन ठाकूर .अजय पाटील .अनंत ठाकूर .एकनाथ ठाकूर .महेंद्र म्हात्रे .अभिजित पाटील .सागर घरत .घनश्याम तांडेल .सर्वेश घरत .तेजस घरत .दिव्यांक घरत .व समस्त घरत परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.