पाळधी बुद्रुक व खुर्द येथे ३१सकाळी ११ पर्यंत संचारबंदी
पाळधी बुद्रुक व खुर्द येथे ३१सकाळी ११ पर्यंत संचारबंदी
प्रतिनिधी धरणगाव -२८ रोजी रात्री साडे आठ वाजता पाळधी ता. धरणगाव मधून श्री सप्तश्रृंगी देवी गड, वणी येथे जळगाव येथून दिंडी जात असतांना काही समाजकंटकांनी दिंडीवर दगडफेक केली. त्यामुळे दोन समाजातील गट आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली. तणावपूर्ण शांतता होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजिवन सुरळीत रहावे याकरीता फोजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी , फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1) (2) व (3) पाळधी बु. व पाळधी खु. ता. धरणगाव येथे दिनांक 29/03/2023 रोजीच्या सकाळी 11 वाजेपासून ते दिनांक 31/03/2023 रोजीच्या सकाळी 11.00 वाजेपावेतो संचारबंदी आदेश लागू करीत आहे. मौजे पाळधी बु. व पाळधी खु. ता. धरणगाव येथे शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखणेबाबतचे गांभीर्य लक्षात घेता, वेळे अभावी संबंधितांना पुरेशी संधी देणे शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा आदेश एकतर्फी लागू करण्यात येत आहे. सदरील आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती/ संस्था / संघटना यांचे विरूध्द प्रचलित कायद्यात नमूद केल्यानुसार कायदेशिर कारवाईस पात्र राहतील. सदरचा आदेश हा अत्यावश्यक सेवा उदा. शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पोलीस, रुग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, तसेच आर्थिक वर्षाचा शेवट असल्या कारणाने गावातील सरकारी/खाजगी बँक / पतसंस्था व अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.असं आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी काढले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत