Contact Banner

२५ लाखाचे बक्षीस असलेल्या २ नक्षलीसह पाच नक्षलींना कंठस्नान सुरक्षा दलाचे कोम्बिंग ऑपरेशन

 

२५ लाखाचे बक्षीस असलेल्या २ नक्षलीसह पाच नक्षलींना कंठस्नान   सुरक्षा दलाचे कोम्बिंग ऑपरेशन

२५ लाखाचे बक्षीस असलेल्या २ नक्षलीसह पाच नक्षलींना कंठस्नान 

सुरक्षा दलाचे कोम्बिंग ऑपरेशन 

वृत्तसंस्था झारखंड -झारखंडच्या चतरात सोमवारी झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलांनी ५नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यापैकी २नक्षल्यांवर प्रत्येकी २५लाख रुपयांचे बक्षीस होते. घटनास्थळावरून २AK४७जप्त करण्यात आल्यात. या भागात सुरक्षा दलांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

    ही चकमक लातेहार, पलामू व चतरा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील लाव्हालौंगच्या रीमी गावालगत घडली. त्यात २५ लाखांचे बक्षीस असणाऱ्या गौतम पासवान व चार्ली नामक नक्षलवादी मारले गेले. गौतम पासवान लातेहार, पलामू व चतरा जिल्ह्यात सक्रीय होता. उर्वरित मृत नक्षल्यांत सब झोनल कमांडर नंदू, अमर गंझू व संजी व भुइंया यांचा समावेश आहे.

    सोमवारी सकाळी ९च्या सुमारास कोब्रा २०३ टीम व नक्षलवाद्यांत चकमक सुरू झाली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी २सॅक मेम्बर व ३ सब झोनल कमांडर आहेत. सब झोनल कमांडरांवर प्रत्येकी ५लाख रुपयांचे बक्षीस होते.

   एसपी राकेश रंजन यांच्या निर्देशांनुसार, सुरक्षा दलांनी पलामू-चतरा सीमेवर माओवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. ही कारवाई सीआरपीएफ कोब्रा बटालियन, जेएपी, आयआरबी तसेच पलामू व चतरा जिल्हा दलाने संयुक्तपणे केली. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.