Contact Banner

दिघोडे येथे प्रकाश झोतातील भव्य दिव्य नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन

दिघोडे येथे  प्रकाश झोतातील भव्य दिव्य नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन


दिघोडे येथे  प्रकाश झोतातील भव्य दिव्य नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन 

उरण (सुनील ठाकूर  ).गावचे माजी सरपंच तथा सदस्य कीर्तिनिधी ठाकूर .क्रिकेट मधील कोहिनुर हिरा सर्वांच्या  गळ्यातील  ताईत विश्वजीत ठाकूर .अभिजित ठाकूर उर्फ छोट्या .मोठ्या यांनी एस .एन स्पोर्ट्स च्या वतीने दिघोडे येथील हायस्कुल च्या मागील मैदानावर दिनांक ३१मार्च 2023 ते २ एप्रिल 2023 या कालावधीत प्रकाश झोतातील भव्य दिव्य नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे .सदर सामन्यांचे उद्घाटन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री महेंद्र घरत यांच्या हस्ते झाले .

 या सामन्यांचे खास आकार्षण होते ते  उरण तालुक्यात पहिल्यांदाच रायगड  विरुद्व ठाणे हा मैत्रीपूर्ण लढतीचा सामना खेळविण्याचा मान एस .एन .स्पोर्ट दिघोडे च्या आयोजकांना मिळाला .हि लढत बघण्या साठी रायगड  ठाणे नवी मुंबई लावलहजारो क्रिकेट  प्रेमींनी हजेरी लावली होती .

या सामन्यात प्रथम क्रमांकास रोख दोन लाख व भव्य ट्रॉफी द्वितीय क्रमांकास रोख एक लाख व भव्य टॉफी तसेच मालिका वीर साथ बाईक .गोलंदास .फलंदाज क्षेत्र रक्षक यांना सायकल तसेच बक्षिसांची लयलूट ठेवण्यात आली होती .

  सदर सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी रायगड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत .माजी सरपंच काशिनाथ पाटील .अविनाश पाटील .सचिनशेठ घरत (उधोगपती शेतघर ).नरेश शेठ भोईर .(चित्रपट सेने महाराष्ट् राज्य अन्न.मंत्रालय सदस्य दिल्ली ).राहुल भाई (उधोगपती आडवली ).सुभाष शेठ पाटील (उधोजग उलवे ).मिलिंद पाडगावकर (रायगड जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस ).

 राजेश घरत (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सेवा समिती ).विनोद म्हात्रे (काँग्रेस उरण तालुका अध्यक्ष ).मार्तंड नाखवा(सदस्य महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी ).नगरसेवक अतुल  ठाकूर .नगरसेविका सौ .मीरा पाटील .झाईद नाझीर (ए तू झेड मरहबा ट्रॅव्हल ).अनुप पाटील (ए आर इंटरप्रायजेस ).आकाश नाखवा (उधोजग दिघोडे ).केतन शेठ तरे (उपसरपंच अंजूर ).अनंत म्हसकर (उधोजग सुकापूर ).तेजाब म्हस्के .रोशन डाकी (बोरखार ).श्री वर्षकेतू ठाकूर (महाराष्ट्र राज्य औधोगिक विकास मंडळ अभियंता ).श्री एकनाथ घरत   (महाराष्ट्र राज्य औधोगिक विकास मंडळ).प्रफुल्ल पाटील (सदस्य ).आदी सह ग्रामस्थ व मोठ्या संख्येने क्रिकेट रसिकांची उपस्थिती लाभली होती .

 या सामन्या साठी गुणलेखक कांचन पालकर (केवाले ).अंपायर ची कामगिरी शशी मेहेर .नीरज रणावत .दीपक बोराडे .हेमंत कोळी करत असून समालोचक चंदू शेट्टे .दिनेश पाटील रोशन पाटील करीत आहेत तर शानदार निवेदन रेशमा मयेकर करत असून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण टेनिस क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.