रावेर बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची यादी जाहीर होताच,भाजपमध्ये खलबत सुरू तर अपक्षांमुळे रंगत वाढणार!
रावेर बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची यादी जाहीर होताच,भाजपमध्ये खलबत सुरू तर अपक्षांमुळे रंगत वाढणार!
लेवा जगत न्यूज रावेर-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दिनांक २८ रोजी होऊ घातलेली आहे. त्या आधी आज सोमवार सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीच्या अधिकृत शेतकरी विकास पॅनल ची घोषणा करण्यात आली. तामसवाडी येथील ओंकारेश्वर मंदिरात आज प्रचार नारळ आमदार शिरीष दादा चौधरी व रोहिणी खडसे खेवलकर,रवींद्र पाटील ,माजी आमदार अरुण पाटील,धनंजय चौधरी,रमेश पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीची यादी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. सेवा सहकारी संस्था मतदारसंघात डॉ. राजेंद्र नारायण पाटील मोरगाव ,किशोर लक्ष्मण चौधरी खिरोदा, पंकज राजू पाटील ऐनपुर, राजेंद्र पंढरीनाथ चौधरी खिरवड ,लक्ष्मण बाबुराव मोपारी खिरोदा प्र रावेर, मंदार मनोहर पाटील धामोडी, योगीराज गबाजी पाटील मोरगाव बुद्रुक तर इतर मागासवर्गीय मधून सचिन रमेश पाटील खिरवड, भटक्या विमुक्त जमाती मधून जयेश राजेंद्र कुईटे अटवाडा, महिला राखीव मतदारसंघातून शारदा हेमराज पाटील रायपुर, मनीषा सोपान पाटील दोघे, ग्रामपंचायत मतदार संघातून कैलास विठ्ठल सरोदे मस्कावद ,योगेश ब्रिजलाल पाटील मुंजलवाडी तर आर्थिक दुर्बल घटक मधून पांडुरंग शिवराम पाटील अजंदा, अनुसूचित जमाती मतदार संघातून कामिल नामदार तडवी, व्यापारी मतदारसंघातून विलास श्रावण चौधरी, रोहित अनिल अग्रवाल, हमालमापाडी मतदारसंघातून सय्यद अजगर सय्यद सुपडू अशी यादी आज जाहीर करण्यात आली या यादीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर माणिकराव पाटील, शिवसेना(उबाठा)तालुका प्रमुख प्रवीण सुरेश पंडित तर काँग्रेसचे तालुका प्रमुख डॉ.राजेंद्र पाटील यांच्या सह्या आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत