महाविकास आघाडीची यादीजाहीर होताच तासाभरात भाजपा सेनेची बाजार समितीसाठीचे उमेदवार जाहीर
महाविकास आघाडीची यादीजाहीर होताच तासाभरात भाजपा सेनेची बाजार समितीसाठीचे उमेदवार जाहीर
लेवजगत न्यूज सावदा -रावेर बाजार समिती च्या निवडणुकीची महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलची यादी जाहीर होताच तासाभरातच भाजपा सेनेच्या लोकमान्य शेतकरी पॅनल ची यादी तालुका प्रमुख राजन लासूरकर व दिनेश पाटील यांनी यादी जाहीर केली .यात इंदिरा काँग्रेसचे गोंडु महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रावेर बाजार समितीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना पुरस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनलची उमेदवारी यादी आज सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आली.
सेवा सहकारी संस्था मतदार संघात प्रल्हाद पंडित पाटील मोरगाव, गोंडू रामदास महाजन रमजीपुर, दिलीप चुडामण पाटील उटखेडा,गोपाळ लक्ष्मण नेमाडे चिनावल, राहुल गोपाळ महाजन वाघोदा, चेतन श्रावण पाटील उटखेडा, संजय शिवराम महाजन चोरवड तर इतर मागासवर्गामधून दुर्गादास बाबुराव पाटील निंभोरा बुद्रुक, महिला राखीव मतदार संघात कल्पना उत्तमराव पाटील खिरवळ, सविता दिनेशउर्फ छोटू पाटील रेंभोटा, प्रवीण सुपडू पाचपोहे मुंजलवाडी हे भटके विमुक्त मतदार संघातून उमेदवारी करतील ग्रामपंचायत मतदार संघात महेंद्र कडू पाटील नेहते, नितीन रामलाल भोगे मस्कावद, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून सुनील दामोदर पाटील, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून सिकंदर समशेर तडवी मोरव्हाल ,व्यापारी मतदारसंघातून रितेश संतोष पाटील सावदा, शेख लुकमान शेख निसार रसलपुर, हमाल-मापाडी मतदारसंघातून वसंत मधुकर येवले कोचूर अशा उमेदवारांची नावे आज भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने भाजपा तालुकाप्रमुख राजन लासुरकर व शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश उर्फ छोटू पाटील यांनी जाहीर केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत