Contact Banner

वरूडात दखलपात्र गुन्हा घडवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक ! दोन तलवारी एक चाकू जप्त !

वरूडात दखलपात्र गुन्हा घडवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक !  दोन तलवारी एक  चाकू जप्त !


वरूडात दखलपात्र गुन्हा घडवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक !

दोन तलवारी एक  चाकू जप्त !

लेवाजगत न्यूज वरूड:- स्थानिक नया दायरा परिसरात गुन्हेगारी कृत्य करून दखलपात्र गुन्हा घडवून  दहशत पसरविन्याच्या हेतूने तलवार आणि चाकू घेऊन असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीसानी तीघाना  ताब्यात घेऊन अटक केली. यांचेकडून दोन तलवारी ,एक धारदार चाकू जप्त केला. 

      पोलीस सूत्रानुसार,अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावं दिलेर शहा पिरु शहा २८,बाबा शहा उर्फ सोहेल शहा उमर शहा २५,वाँटेड उर्फ सादिक शहा बाबुशहा २५ सर्व रा. नया दायरा वरूड असे आहे.नया दायरा परिसरात काही इसम  दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने घातक शस्त्र घेऊन दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून  ठाणेदार प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनखाली पोलीस पथकाने  जाउन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून दोन तलवारी, एक धारदार चाकू जप्त करून तिन्ही आरोपींना अटक केली. शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवहि उपनिरीक्षक धीरज राजूरकर ,सहायक फौजदार राजू मडावी ,अंमलदार राजू डीहिये,राजू चव्हाण,विनोद पवार,सचिन भगत,प्रफुल्ल लेवलकर,सचिन धांडे,किरण गावंडे,योगेश ढंगारे,रामेश्वर इंगोले,विशाल सूर्यवंशी,राजू पडघामोल,कैलास हटवार यांचे पथकाणे केली. पुढील तपास वरूड पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.