गुरे चारणारी दोन बालके निंबादेवी धरणात बुडाली,एकाचा मृतदेह शोधण्यात यश
गुरे चारणारी दोन बालके निंबादेवी धरणात बुडाली,एकाचा मृतदेह शोधण्यात यश
लेवाजगत न्यूज यावल- तालुक्यातील सावखेडा सिम जवळील निंबादेवी धरणात दोन आदिवासी बालकं बुडाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. पैकी १४ वर्षीय बालकाचा मृतदेह धरणातून काढण्यात आला. १० वर्षीय बेपत्ता बालिकेचा अद्याप शोध लागलेला नाही. ही दोन्ही बालकं निमछाव आदिवासी वस्तीवरील असून गुरेचराई करत असताना गुरांना धरणावर पाणी पाजण्यासाठी आले होते.lewajagat news
सावखेडासीम गावाजवळ निंबादेवी धरण आहे. या धरण परिसरात मंगळवारी सायंकाळी गुरे चारण्यासाठी निमछाव आदिवासी वस्तीवरील बालके आली होती. यावेळी आसाराम शांतीलाल बारेला (वय १४) व नेनू किसन बारेला ( वय १०) हे दोघे पाण्यात उतरले. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे धरणात बुडून बेपत्ता झाले. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी सावखेडा सिम पोलिस पाटील पंकज बडगुजर यांना माहिती दिली. यानंतर बडगुजर हे ग्रामस्थांना घेऊन धरणावर पोहोचले. अंधार पडण्यापूर्वी शोधमोहीम राबवून आसाराम शांतीलाल बारेला याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पण नेनू बारेला या बालिकेचा शोध लागला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत