तुम्हाला अभिनयाने हीरो व्हायचे आहे की आपल्या कामाने? एन.रघुरामन, मैनेजमेंट गुरू
तुम्हाला अभिनयाने हीरो व्हायचे आहे की आपल्या कामाने? एन.रघुरामन, मैनेजमेंट गुरू
ही कथा १९७० च्या दशकातील आहे. आनंद वर्मा हे एका शिपयार्डमध्ये मजूर होते.. गुंडांनी छळलेल्या कामगारांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी कामगार संघटनेचा नेता बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा व्यवस्थापनाने समाजात त्यांची बदनामी केली आणि लाजेमुळे आनंद यांनी घर सोडले. त्यांचे दोन मुलगे, विजय वर्मा आणि रवि वर्मा यांचे संगोपन कोर्ट-कचेरी व अडचणींनी त्रस्त त्यांच्या गरीब आईने एकटीने केले. आपल्या वडिलांवर झालेल्या अन्यायाची पूर्ण जाणीव असलेला विजय त्याच गोदीत मजूर म्हणून काम सुरू करतो आणि हळूहळू अंडरवर्ल्ड तस्करीचा एक प्रमुख चेहरा बनतो. कथेवरून तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. हा १९७५ चा 'दीवार' चित्रपट आहे. आणि विजय वर्मा डॉकयार्डच्या गुंडांचा बदला घेतो तेव्हा आपण प्रेक्षकांना पूर्ण समाधान आणि आनंद होतो की, तो उच्च समाजजीवन जगत गुंडांना धडा शिकवू शकतो. पण, विजयाचा जल्लोष करणाऱ्या आपल्यापैकी बहुतेकांना हेही माहीत आहे की, खऱ्या आयुष्यात एक माणूस शेकडो गुंडांना हाताने मारू शकत नाही.. पण, २७ वर्षीय हुसैन सय्यदने विजय वर्माने दीवारमध्ये जे केले ते करायचे ठरवले- शेजारी आणि त्यांच्या नशिबावर वेगळ्या पद्धतीने विजय मिळवला. त्याचे वडील रमजान इस्माईल सय्यद हे मुंबईतील इंदिरा डॉक येथील लोडिंग आणि अनलोडिंग विभागात कंत्राटी कामगार आहेत. आनंद वर्माप्रमाणे तेही पाठीवर पोती वाहून नेतात आणि मुंबईच्या वाडीबंदरमधील झोपडपट्टीत एका खोलीत राहतात. विजय वर्मा जसा जन्मापासून गरीब वसाहतीत वाढला, त्याचप्रमाणे हुसेननीही जमिनीवरचा कौटुंबिक संघर्ष पाहिला. पण, विजयची भूमिका करणारे अमिताभ बच्चन त्यांचे प्रेरणास्थान असले तरी त्यांनी विजय वर्मा बनणे निवडले नाही. काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या क्षेत्रातील एक मिनी हीरो झाले, कारण त्यांनी २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशभरात ५७० वा क्रमांक मिळवला. तथापि, त्यांना आयपीएस किंवा आयआरएस पोस्टिंग मिळण्याची आशा आहे, तरीही बँक सुधारण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यायची आहे! दुसरे उदाहरण घ्या. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील सूरज तिवारी (२९) सध्या जेएनयूमधून रशियन भाषेत एमए करत आहे. २०१७ मध्ये चालत्या ट्रेनमधून पडल्यानंतर त्याचे दोन्ही पाय एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे कापण्यात आली होती. बहुतांश लोकांना वाटले की, तो आयुष्यभर स्वावलंबी होऊ शकणार नाही. परंतु, त्याने सर्वांना चुकीचे सिद्ध केले आणि त्याच यूपीएससीमध्ये पहिल्याच प्रयत्नात ९१७ वा क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे २३ वर्षीय कनिका गोयल तिच्या कुटुंबातील पहिली पदवीधर असून यूपीएससीमध्ये टॉप-१० रँकही मिळवला. नागरी सेवा परीक्षेत तिचा नववा क्रमांक हरियाणातील सर्वोत्तम रैंक आहे. तिने एखाद्या टॉप कोचिंगमध्ये प्रवेश घेतला असेल, असे वाटत असेल तर तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, तिने कोचिंग केले नाही व त्याऐवजी ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि मॉक इंटरव्यू दिले. वेगवेगळी पुस्तके वाचली व रोज प्राणायाम केला. • फंडा असा : चित्रपट काल्पनिक कथेने नायकाच्या जीवनात काही अॅक्शन जोडतात, त्याला फोडणी जोडतात, पण आपणही हुसेन किंवा सूरज किंवा इतरांसारखे काम करून आपले जीवन मसालेदार करू शकतो. तुम्हाला काय व्हायचे ते ठरवा अँक्शन हीरो की - आपल्या कामातून खरा हीरो होणारा नायक!
मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन, मैनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]संदर्भ-दिव्यमराठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत