फैजपूर येथील श्रीराम टॉकीज मध्ये “द केरला स्टोरी” चित्रपट चालू असतांना दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर तत्काळ कार्यवाही करा; खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची पोलिसांना मागणी
फैजपूर येथील श्रीराम टॉकीज मध्ये “द केरला स्टोरी” चित्रपट चालू असतांना दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर तत्काळ कार्यवाही करा; खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची पोलिसांना मागणी
उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, मंत्री श्री.गिरीषजी महाजन व पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली दूरध्वनीद्वारे तक्रार...
लेवाजगत न्युज फैजपूर (यावल):- येथील श्रीराम टॉकीज मध्ये “द केरला स्टोरी” हा बहुचर्चित चित्रपट ३ दिवसापूर्वी चालू असतांना काही समाजकंटाकांद्वारे चित्रपट गृहाच्या पत्री छतावर मोठ्यासंख्येने दगडफेक केली होती, यावेळी चित्रपट गृहात मोठ्यासंख्येने उपस्थित महिला वर्ग घाबरून, त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
३ दिवस उलटून सुद्धा सदर समाजकंटाकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिसांतर्फे कार्यवाही करण्यात आली नाही तेव्हा स्थानिक नागरिकांनी फैजपूर पोलीस स्टेशन येथे आंदोलन केले असता, आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी फैजपूर येथे भेट देऊन सदर गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध लावून कठोर कार्यवाही करणे बाबत संबंधित स्थानिक पोलीस प्रशासनास सूचना केल्या व दगडफेकीची घटना घडलेल्या श्रीराम टॉकीज येथे पाहणी केली, तसेच उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, मंत्री श्री.गिरीषजी महाजन व जळगांव पोलीस अधिक्षक यांना सदर घटनेची दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती दिली व स्थानिक पोलिसांची तक्रार करून तत्काळ उचित कार्यवाही करण्याची मागणी केली.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी, डीवायएसपी श्री.कुणाल सोनवणे, माजी जि.प.सदस्य श्री.भरत महाजन, महिला आघाडी तालुकाध्यक्ष श्री.जयश्री चौधरी, सावदा माजी नगरसेविका सौ. रंजना भारंबे, सौ.सारिका चव्हाण, सावदा भाजपा शहराध्यक्ष श्री.जे.के.भारंबे, फैजपूर माजी नगराध्यक्ष श्री.पिंटू राणे, श्री.बी.के.चौधरी, फैजपूर भाजपा शहराध्यक्ष श्री.अनंत नेहेते, श्री.नितीन नेमाडे, श्री.बापू वाघुळदे, श्री.नरेंद्र नारखेडे, श्री.पप्पू चौधरी, श्री.पंकज नारखेडे, श्री.कालिदास ठाकूर, डॉ.शेखर पाटील, सावदा माजी नगरसेवक श्री.राजेंद्र चौधरी, श्री.संतोष परदेशी, श्री.महेश अकोले, श्री.योगेश भंगाळे, श्री.योगेश बोरोले, श्री.अनिरुद्ध सरोदे, श्री.रितेश पाटील व स्थानिक ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत