Header Ads

Header ADS

नांदगावला २९ व ३० मे ला मेगा ब्लॉग,आठ प्रवाशी गाड्या रद्द

नांदगावला २९ व ३० मे  ला मेगा ब्लॉग,आठ प्रवाशी गाड्या रद्द

 

नांदगावला २९ व ३० मे  ला मेगा ब्लॉग,आठ प्रवाशी गाड्या रद्द

लेवाजगत न्यूज नांदगाव - मनमाड विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे सोमवारी दिनांक २९ व मंगळवारी दिनांक ३० नाशिकरोड व नांदगावमार्गे जाणाऱ्या आठ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या व पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

   सोमवारी (दि.२९) भुसावळ -देवळाली (११११४), पुणे- भुसावळ (११०२६), नागपूर -मुंबई सेवाग्राम (१२१४०) तर मंगळवारी (दि.३०)भुसावळ- इगतपुरी (१११२५), इगतपुरी -भुसावळ पॅसेंजर (११११९), देवळाली -भुसावळ पॅसेंजर (११११३) आणि भुसावळ -पुणे हुतात्मा (११०२५) या गाड्या रद्द आहेत.

   मार्ग बदललेल्या गाड्या : दि.२८ मे रोजी एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस (१२६१७) रोहा, वसई, उधना जळगाव मार्गे जाईल. दि.२९ मे रोजी अमृतसर- नांदेड सचखंड एक्सप्रेस (१२७१६) भुसावळ अकोला मार्गे जाईल. तर मंगला एक्सप्रेस (१२६१८) जळगाव, उधना, वसई, रोहा मार्गे जाईल. दि. ३० मे रोजी नांदेड -निजामुद्दीन एक्सप्रेस (१२७५३) अकोला भुसावळ मार्गे, सचखंड एक्सप्रेस (१२७१५) अकोला- भुसावळ मार्गे धावणार आहे.

  रद्द झालेल्या रेल्वे

   भुसावळ -देवळाली एक्सप्रेस, पुणे- भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस, नागपूर -मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस, इगतपुरी -भुसावळ पॅसेंजर, देवळाली -भुसावळ पॅसेंजर आणि भुसावळ -पुणे हुतात्मा एक्सप्रेस. मार्ग बदललेल्या रेल्वे : मंगला एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.