Header Ads

Header ADS

वाघोदा खुर्द येथे झन्न मन्ना जुगार खेळणाऱ्या वर सावदा पोलिसांची कारवाई

वाघोदा खुर्द येथे झन्न मन्ना जुगार खेळणाऱ्या वर सावदा पोलिसांची कारवाई


 वाघोदा खुर्द येथे झन्न मन्ना जुगार खेळणाऱ्या वर सावदा पोलिसांची कारवाई

लेवाजगत न्यूज सावदा -येथून जवळच असलेला सावदा पोलीस ठाणें हद्दीतील वाघोदा खुर्द येथे मस्कावद रोड वरील  झाडाझुडपाच्या आत सार्वजनिक जागेवर  झान्न मन्ना  खेळताना आढळल्याने सावदा पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याजवळून पस्तीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९२०० रुपये रोख व सात मोबाईल व जुगाराची साधने असे ताब्यात घेण्यात आली आहे.

   सावदा पोलिसांच्या पथकाने  शनिवारी दुपारी तीन वाजता केलेल्या या कार्यवाहीत   धनराज राजेंद्र पाटील वय ३०, अन्वर उर्फ फिरोज सरवर पटेल वय ३५, साबीर सिकंदर पटेल वय २५, विनोद काशिनाथ कोळी वय ४२, सुभाष मुरलीधर पाटील वय ६२, अरविंद उर्फ दीपक रमेश पाटील वय ४०, सुभाष धोंडू चौधरी वय ६१, शाहरुख सिकंदर पटेल वय २५, उमेश पंडित कोळी वय ३०, अनिल रसूल पटेल वय ४३ सर्व राहणार वाघोदा खुर्द तालुका रावेर काशिनाथ घावा करोसिया  वय ४० राहणार मेहतर  कॉलनी सावदा तालुका रावेर यांना ताब्यात घेण्यात  आलेले असून या पथकास मार्गदर्शन सपोनि जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहहायक फौजदार पांडुरंग सपकाळे, कॉन्स्टेबल विजय पोहेकर, संजीव चौधरी, पोलीस नायक अक्षय हीरोळे, यशवंत टहाकले, विनोद भीमराव  दामोदरे इत्यादींनी ही जुगार ऍक्ट नुसार कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.