पाचोरा तालुक्यातील चिमुकल्यासह विवाहितेचा मृदेह आढळला विहीरीत
पाचोरा तालुक्यातील चिमुकल्यासह विवाहितेचा मृदेह आढळला विहीरीत
लेवाजगत न्यूज पाचोरा-तालुक्यातील लासगाव येथील चिमुकल्यासह विवाहितेचा मृदेह विहीरीत आज दिनांक ३० मे २०२३ मंगळवार रोजी आढळून आल्यानंतर लासगाव गावासह तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात असून सदर घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की लासगाव येथील रहिवासी आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच मामाची मुलगी लजिनाबी हिच्याशी झाला होता. लग्नानंतर काही वर्षातच यांना पुत्ररत्न प्राप्त होऊन याचे नाव असद ठेवण्यात आले होते. पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर संसाराचा गाडा आनंदात चालला होता. याच आनंदाच्या भरात बोलता, बोलता असद आता ५ महिन्यांचा झाला होता. याच आनंदाने नांदत असलेल्या संसाराला कुणाची दृष्ट लागली कोण जाणे व आज३० मे २०२३ मंगळवार रोजी लजिनाबी व पाच महिन्यांचा मुलगा असद यांचे मृतदेह लासगाव शिवारातील एका विहिरीत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, राहुल बेहेरे, दिलीप वाघमोडे व रुग्णवाहिका चालक यांच्यासह रुग्णवाहिका सोबत घेत घटनास्थळी दाखल होऊन सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन रुग्णवाहिका चालक अमोल पाटील याच्या मदतीने मयत अजिनाबी शेख व असद शेख या बालकाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणून पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृतूची नोंद करण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामनेर बिटचे पोलीस कॉन्स्टेबल हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत