रेल्वे खाली आलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे सावदा पोलीस ठाण्याचे आवाहन
रेल्वे खाली आलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे सावदा पोलीस ठाण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा -सावदा पोस्टे हद्दीत थोरगव्हाण तालुका रावेर शिवारात (रेल्वे ब्रिज तयार होत आहे तिथे)खंबा क्रमांक 458 /16, 458/18 या दरम्यान एक अनोळखी पुरुष जातीचा इसम वय अंदाजे 40 हा धावत्या रेल्वे खाली येऊन मयत आढळून आलेला आहे. त्याचे अंगात पांढऱ्या रंगाचे बारीक चौकट असलेले शर्ट असून निळसर भुरकट रंगाचे बनियान तसेच कमरेत निळ्या रंगाची निकर व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. त्याबाबत सावदा पोस्टेला अमृ रजिस्टर नंबर 13/2023 सी आर पी सी 174 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे यातील मयता बाबत किंवा त्याचे वारसा बाबत काही माहिती मिळून आल्यास तात्काळ सावदा पोस्टे शी 02584-222043 संपर्क साधावा.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत