समृद्धी मार्गावर दगडफेक करून खाजगी बस लुटण्याचा प्रयत्न एक जखमी
समृद्धी मार्गावर दगडफेक करून खाजगी बस लुटण्याचा प्रयत्न एक जखमी
लेवाजगत न्यूज कारंजा-वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कारंजा तालुक्यात येणाऱ्या १९५ चॅनेज नंबरवर रात्री साडे बाराच्या सुमारास नागपूर वरून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांच्या बस लुटण्याच्या प्रयत्नात बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
बसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. तसेच दगडफेकीमुळे बसमधील प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाली होते. बसवर दगडफेक होत असताना चालकाने प्रसंगावधान राखत, समय सुचकता ठेऊन, बसवर नियंत्रण मिळवत बस समोर नेऊन उभी केल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावर असलेली १०८ रुग्णवाहिका चालक विधाता चव्हाण, डॉ. भास्कर राठोड हे घटनास्थळी दाखल होऊन, जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले आहे.
समृद्धी महामार्गावर सतत होणारे अपघात आणि दगडफेकीच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे प्रशासना कडुन उपाय योजना करून ही कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या, प्रवासांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन, योग्य ते उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत