अट्रावलच्या गुराख्यांची शेतकऱ्याला मारहाण
अट्रावलच्या गुराख्यांची शेतकऱ्याला मारहाण प्रतिनिधी | यावल तालुक्यातील अट्रावल शिवारात केळीच्या बागेत बकऱ्या का घातल्या ? अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला अट्रावल येथील दोन गुराख्यांनी मारहाण केली. पिकाचे नुकसान केले. दोघांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
अट्रावल शिवारात गट क्रमांक ८२७ व ८११ मध्ये यावल शहरातील महाजन गल्लीतील शेतकरी निर्मल नथू चोपडे यांनी केळी लागवड केली आहे. त्यांच्या केळी बागेत सागर मानोकर व नामदेव कोळी (दोघे रा. अट्रावल ) यांनी अनधिकृतपणे बकऱ्या घालून नुकसान केले. त्यांना जाब विचारला असता दोघांनी निर्मल चोपडे व सोबतचे सागर इंगळे यांना मारहाण केली. ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निर्मल चोपडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत