रावेर भाजपा चे युवा कार्यकते संदिप सावळे पाठपुरावा आणि ६१२ शेतक-यांची नुकसान भरपाई मंजूर -युवा शेतकरी संदीप सावळे यांच्या प्रयत्नाला आले यश
रावेर भाजपा चे युवा कार्यकते संदिप सावळे पाठपुरावा आणि ६१२ शेतक-यांची नुकसान भरपाई मंजूर -युवा शेतकरी संदीप सावळे यांच्या प्रयत्नाला आले यश
रावेर(लेवाजगत न्यूज प्रतिनिधी):- रावेर तालुक्यात वादळी पासवामुळे २०२२ मध्ये झालेल्या नुकसान भरपाईला शासनाने मंजूरी दिली आहे.भाजपाचे युवा कार्यकर्ते संदीप सावळे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वारंवार प्रर्यत्न केले होते.यामुळे शेतक-यां मधुन समाधान व्यक्त होत आहे.
रावेर तालुक्यात ३१ मे २०२२ रोजी मोठ्या प्रमाणात वादळी पावसामुळे नुकसान झाले होते.यामध्ये आहीरवाडी कर्जोद पाडला निरुड चोरवड अजनाड चिनावल लोहारा विवरे वडगाव कुंभारखेडा सावखेडा गौरखेडा खानापुर अजनाड येथील सुमारे ६१२ शेतक-यांचे तब्बल २७४.७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाल होते.यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदील झाला होता.याबाबत भाजपा तर्फे आर्थिक पदरमोड करून मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर युवा कार्यकर्ते संदीप सावळे यांनी वारंवार पत्रव्यवहार केला होता. अखे यांच्या पत्रांची दखल घेऊन रावेर तालुक्यातील शेतक-यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.यामुळे शेतक-यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत