Header Ads

Header ADS

शरद पवार दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येणार १५ रोजी आगमन, पक्षाचा विस्तृत आढावा घेणार

Sharad-Pawar-will-come-on-a-tour-of-the-district-for-two-days-on-15th-arrival,-will-take-a-detailed-review-of-the-party

 

शरद पवार दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येणार १५ रोजी आगमन, पक्षाचा विस्तृत आढावा घेणार 

 लेवाजगत न्यूज जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय सेलच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे १५ व १६ जून रोजी दोन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने १४ रोजी नियोजनासाठी जिल्हा व महानगराची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

Sharad-Pawar-will-come-on-a-tour-of-the-district-for-two-days-on-15th-arrival,-will-take-a-detailed-review-of-the-party


शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी आल्यानंतर खळबळ  उडाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, खासदार पवार हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार हे १५ जून रोजी रात्री ८.५० वाजता राजधानी एक्स्प्रेसने जळगावात दाखल होतील. त्यानंतर जैन हिल्स  येथे रात्री मुक्काम होईल. १६ रोजी सकाळी ८ वाजता अमळनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनासाठी रवाना होतील. सकाळी ११ ते १२.३० वाजेपर्यंत अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी २ अमळनेर येथून जळगावकडे रवाना होतील. तसेच दुपारी ४ वाजता जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर रात्री ११.३० वाजता अमरावती एक्स्प्रेसने रवाना होणार आहेत. |

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.