हरवलेल्या वृद्धांचा खून झाल्याचे चाळीस दिवसांनी उघडकीस
हरवलेल्या वृद्धांचा खून झाल्याचे चाळीस दिवसांनी उघडकीस
जामनेर जळगाव:-जामनेर तालुक्यातील जांभळी येथील मागील ४० दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मित्रानेच खून केल्याचे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहे. आरोपीने खुनाची कबुली दिलीय अगदी खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड, मयताचे कपडेही पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतू मृतदेह नेमका कुठं ?, त्याची विल्हेवाट कशी आणि कुठं लावली?, याबाबत मात्र, आरोपी बोलायला तयार नाहीय. त्यामुळे मयताचा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान जळगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. कैलास विठोबा वडाळे (वय ४९, रा. जांभळी ता. जामनेर) असे मयताचे नाव आहे. तर ४० दिवसांनंतर अटक केलेल्या रमेश संपत मोरे (वय ५४, रा. वडाळी ता. जामनेर) असे आरोपीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं !
या संदर्भात अधिक असे की, जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील रहिवासी कैलास विठोबा वडाळे १३ मे रोजी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता झाले होते. परिवारातील लोकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे मुलगा अविनाशने १४ मे रोजी पहूर पोलीस स्टेशनमध्ये वडील कैलास वडाळे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पहूर पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांचा कुठंही शोध लागला नाही. एक-एक करीत महिना उलटून गेला. पण कुठलीच माहिती हाती लगत नव्हती. शेवटी कैलास वडाळे यांच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली आणि सर्व हकीगत सांगितली. पोलीस अधीक्षकांनी घटनेचे गांभीर्य •लक्षात घेत याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला करण्याचे आदेश दिले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किस नजन पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे पथक कामाला लावले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत