Header Ads

Header ADS

उरण येथे सामाजिक सक्षमीकरण शिबिर संपन्न

 

Uran-Here-Social-Empowerment-Camp-Complete

उरण येथे सामाजिक सक्षमीकरण शिबिर संपन्न

उरण (सुनिल ठाकूर )संसदरत्न खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे साहेब मावळ लोकसभा आणि दिव्यांग विकास सामाजिक न्याय मंत्रालय याच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सक्षमीकरण शिबिर संपन्न.



    या शिबिरा च्या माध्यमातून भारत सरकारच्या ADIP योजने अंतर्गत  दिव्यांग्याच्या जीवन शैलीत बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री श्री. डॉ. वीरेंद्र कुमार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब याच्या प्रयत्नांने संपूर्ण देशभरात दिव्यांगाना आवश्यक साहित्य व वस्तू चे वाटप करण्यात येत आहे.

       या केंद्र सरकार च्या उपक्रमा चा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील गरजू दिव्यांगाना मावळ लोकसभा खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे साहेब याच्या वतीने साहित्य वाटप करण्यात आले व येत्या काही दिवसात दिव्यांगासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्य सरकार च्या वतीने सरकार दिव्यांगाच्या घरी म्हणजे राज्य सरकार च्या दिव्यांगा साठी असलेल्या योजना दीव्यांग कुटुंबाचा घरी पोहचविण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे त्या योजनेमध्ये आरोग्य विमा सोयी सुविधा अशा अनेक योजना राबविण्यात येणार आहेत असे प्रतिपादन खासदार श्रीरंग अप्पा बारणे आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

         सदर कार्यक्रम प्रसंगी सर्व दिव्यांग बंधू भगिनी यांनी खासदार साहेबांचे विशेष कौतुक करून साहेबांचे आभार मानले सदर साहित्य वाटप कार्यक्रमात उरण चे तहसीलदार उध्दव कदम साहेब ग्रामपंचायत जसखार च्या उपसरपंच सौ प्रणाली किशोर म्हात्रे सदस्या सौ धनवंती दिनेश ठाकुर, सौ दमयंती जनार्दन म्हात्रे, सौ सीमा रवींद्र ठाकुर तसेच माजी सरपंच श्री नितीन पाटील विभाग प्रमुख श्रीगणेश घरत शाखाप्रमुख श्री अमित ठाकुर सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत ठाकुर,धनंजय भगत,जयवंत घरत युवा नेते संदीप भोईर,हर्षल ठाकुर,गर्दीष म्हात्रे तसेच अनेक सामाजिक संस्था पदाधिकारी व उरण तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व न्हावा शेवा कस्टम विभाग मोठ्या संख्येने उपस्थित होते.लवकरच ग्रामीण भागात राज्य सरकार व केंद्र सरकार योजना जनसामान्य याच्या घराघरात पोहचविण्यासाठी स्थानिक स्तरावरून प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन जसखार गावचे शिवसेना शाखाप्रमुख श्री अमित ठाकुर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.