Header Ads

Header ADS

जुन्या भांडणातून केला युवकाचा खून, एकाला अटक

 

Jun'yā-bhāṇḍaṇātūna-kēlā-yuvakāchā-khūna,-ēkālā-aṭaka

जुन्या भांडणातून केला युवकाचा खून, एकाला अटक

लेवाजगत भुसावळ : – २३ वर्षीय युवकाला दुचाकीवरून ढकलून दिल्याने डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना फेकरी उड्डाण पुलाजवळील साकरी सर्विस रोडवर शनिवारी पहाटे घडली. जुन्या भांडणातून हा खुनाचा प्रकार झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली. मंगल शांताराम शेळके (२३, फेकरी, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

भुसावळ तालुका पोलिसात आकाश शांताराम शेळके (२५, रा.फेकरी, वाल्मिक नगर, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा लहान भाऊ मंगल शांताराम शेळके (२३) याच्यासोबत पूर्वी झालेलाा वाद उकरुन संशयित राहुल तुकाराम पाडळे (२८, मु.पो. फेकरी, ता.भुसावळ) याने १६ जूनच्या रात्री १२ ते शनिवार, १७ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मंगलची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली तसेच त्याच्याशी झटापट करुन त्याला मोटारसायकल (क्रमांक एम.एच.१९ ई.बी.२०२४) वर जबरदस्तीने बसवत जोराने ढकलून दिल्याने तो फेकरी उड्डाणपुलाखाली पडल्याने त्यास जबर दुखापत होवून मेंदूला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

    या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी संशयित राहुल तुकाराम पाडळे (२८, फेकरी) याला अटक केली आहे. तपास परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.