Header Ads

Header ADS

नऊ महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन, पहिल्याच दिवशी शाळेत भोवळ येऊन कोसळला, आठवीचा विद्यार्थी गतप्राण

Nine-months-ago-father-died-on-the-first-day-in-school-he-collapsed-8th-student-died.html

 

नऊ महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन, पहिल्याच दिवशी शाळेत भोवळ येऊन कोसळला, आठवीचा विद्यार्थी गतप्राण

 लेवाजगत न्यूज भुसावळ-  सीबीएसई माध्यमाच्या शाळा सोमवारी उघडल्या. मात्र पहिल्याच दिवशी डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याचा भोवळ येवून कोसळल्याने सुयोग बडगुजर दुर्देवी मृत्यू झाला. सुयोग भूषण बडगुजर ( वय १३, रा. प्रिमिअर हॉटेल मागे, जामनेर रोड भुसावळ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सुयोग गेल्या दोन महिन्यांपासून हायपर टेंशन, उच्च रक्तदाबाने त्रस्त होता. गुरुवारी (दि.१५) त्याला पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जाणार होते. यापूर्वीच अशी घटना घडली.

Nine-months-ago-father-died,-on-the-first-day-in-school-he collapsed,-8th-student-died.


  सुयोग सोमवारी पहिल्याच दिवशी उत्साहाने शाळेत आला. आवारात असताना मळमळ होत असल्याचे त्याने सांगितले. यादरम्यान भोवळ येऊन तो जमिनीवर कोसळला. शाळेतील शिपाई व कर्मचाऱ्यांनी त्याला उठवण्याचे प्रयत्न केले. मात्र बेशुद्ध असल्याने त्याच्या पालकांना माहिती देण्यात आली. चारचाकी वाहनाने सुयोगला शहरातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. पण, तेथे व्हेंटिलेटरचीसुविधा नव्हती. यामुळे तेथून त्यास डॉ. मानवतकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. राजेश मानवतकर यांनी सुयोगची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आयसीयूमध्ये दाखल केले. व्हेंटीलेटर लावून उपचारसुरू होत नाही तोच सुयोगची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी इलेक्ट्रिक सीपीआर देऊनही उपयोग झाला नाही. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

         नऊ महिन्यापूर्वी १५ सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयातमुक्ताईनगर येथे  सेवेत असताना याच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले होते हा आघात ताजा असताना मुलाच्या दुरुस्तीला कुटुंबाला सामोरे जावे लागले.

     एकुलता एक मुलगा 

 सुयोग हा वर्गातील हुशार विद्यार्थी होता स्वभावाने शांत असल्याने तो शिक्षक प्रिय होता. बडगुजर कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता .त्याच्या अकस्मात मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुयोगच्या पश्चात आई, लहान बहीण, दोन आत्या, मामा असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.