तुमचा दाभोळकर करू:शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळे यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार, सिल्व्हर ओकची सुरक्षा वाढवली
तुमचा दाभोळकर करू:शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळे यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार, सिल्व्हर ओकची सुरक्षा वाढवली
वृत्तसंस्था मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मागण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून 'तुमचा देखील दाभोळकर करू' अशी धमकी देण्यात आली आहे.
'राजकारण महाराष्ट्राचं' या नावाच्या खात्यावरुन अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलभरो आंदोलन आहे. याच दरम्यान ही धमकी आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
'राजकारण महाराष्ट्राचं' या नावाच्या खात्यावरुन धमकी
एका सोशल मीडिया हँडवरुन अशा प्रकारची धमकी येते आणि त्यावर खाली विचित्र आणि दुर्दैवी कमेंट्स येतात, हे राज्यात काय सुरू आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. मला सकाळी व्हॉटसअपवरुन या बाबदची माहिती मिळाली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तंची भेट घेत धमकी प्रकरणी गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तंची भेट घेत धमकी प्रकरणी गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
केंद्रीय आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार
राजकारणात मतभेद जरूर असतात मात्र, इतका द्वेश ज्या पद्धतीने पसरवला जातोय ते अतिशय दुर्दैवी आहे. या धमकीची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मला न्याय मागण्यासाठी मी पोलिस आयुक्तांकडे आले आहे, मला न्याय द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. जर काही झाले तर त्याला सर्वस्वी देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील, असा इशारा देखील त्यांनी दिला.
राज्यात दडपशाही आणि गुंडाराज
राज्यात दडपशाही आणि गुंडाराज वाढला असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोलापूर मध्ये घडलेल्या घडनेचा उल्लेख केला. लोकशाही असली तरी कोणीही कसेही वागेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत