पंजाब नॅशनल बँकेत ग्राहकांची गैरसोय सहा महिन्यापासून प्रिंटर बंद
पंजाब नॅशनल बँकेत ग्राहकांची गैरसोय सहा महिन्यापासून प्रिंटर बंद
लेवा जगत न्यूज सावदा:- शहरातील सर्वात जुनी असलेली पंजाब नॅशनल बँकेतील गलथान कारभाराने ग्राहकता आहेत या बँकेतील बँक खाते पुस्तक प्रिंटर गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे. भरणा स्लिप देखील उपलब्ध करून दिले जात नाही अशी ग्राहकांची ओरळ आहे. शहरातील अतिशय जुन्या बँका यापैकी एक शाखा पंजाब नॅशनल बँकेची आहे.
परिसरातील जनधन योजनेच्या खात्यांचा अनेक शेतकऱ्यांची केळी व्यापाऱ्यांची खाती या बँकेत आहेत. शिवाय रावेर, मुक्ताईनगर ,अंतुर्ली ,फैजपूर ,यावल परिसरातील शेतकरी देखील व्यवहाराचे पैसे काढण्यासाठी सावदा येथे येतात. पण शाखेतील बँक खाते पुस्तक भरण्याचे प्रिंटर सहा महिन्यापासून बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत