Header Ads

Header ADS

मी दोन वर्ष पाटबंधारे मंत्री असताना जिल्ह्यात मंजूर केलेले प्रकल्प गिरीश महाजन पाच वर्ष जलसंपदामंत्री असतानाही ठप्पच-एकनाथ खडसे यांची टीका

 

Criticism of Eknath Khadse-Approved-Projects-Girish-Mahajan-Even-as-Water-Resources-Minister-for-Five-Years-in-the-District


मी दोन वर्ष पाटबंधारे मंत्री असताना जिल्ह्यात मंजूर केलेले प्रकल्प गिरीश महाजन पाच वर्ष जलसंपदामंत्री असतानाही ठप्पच-एकनाथ खडसे यांची टीका

वृत्तसंस्था जळगाव- राज्याचा दोन वर्ष पाटबंधारे मंत्री असताना जिल्ह्यात मंजूर केलेले प्रकल्प गिरीश महाजन पाच वर्ष जलसंपदामंत्री असतानाही ठप्पच आहेच. राज्यात केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरु असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या सिंचन प्रकल्पांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याची टीका आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. सिंचनाच्या प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना केले आहे.


    आमदार खडसे यांनी गुरुवारी तापी पाटबंधारे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांकडून सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पाडळसरे धरणाची प्रकल्प किंमत ४६०० कोटी रुपयांवर गेली आहे. मात्र, या प्रकल्पासाठी शंभर कोटी देण्यात येत आहेत. अशा पध्दतीने निधी मिळत राहील्यास हा प्रकल्प पूर्ण होण्यास ४६ वर्षे लागतील. या प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना केल्याशिवाय पाणी मिळणार नाही. शेळगाव बॅरेज धरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यात ६० टक्के पाणी अडवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या प्रकल्पावर यावल पूर्व व पश्चीम उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्याशिवाय यावलला पाणी मिळणार नाही. त्यासाठी केंद्र शासनाकडून पैसा मिळायला हवा. 

     कुऱ्हा उपसा सिंचन योजनेला पाच वर्षात ११ कोटी रुपये मिळाले. या योजनेला पर्यावरण विभागाची ना-हरकत मिळालेली नसल्याने जैसे थे स्थिती आहे. मुक्ताई कृषी सिंचन योजनेंतर्गत ५० ब्लॉक चुकीचे टाकण्यात आले होते. या योजनेसाठी ५ कोटी देण्यात आले. दुरुस्तीसाठी अजून ५ कोटी आवश्यक आहेत. बोदवड उपसा सिंचन योजनेला आता ५ हजार कोटी खर्च येणार आहे. प्रत्यक्षात १०० कोटी रुपये सरकारकडून प्रत्येकवेळी देण्यात येतात.हतनूर धरणातून गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यास चार दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. 


    प्रकल्पनिहाय माहिती घेतली असता धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सारनखेडा, प्रकाशा प्रकल्पांमध्ये पंधरा वर्षात पाणीसाठा झाला आहे. उपसा सिंचन नसल्याने पाणी थांबलेले आहे. सारनखेडा धरणाचे गेट सडले आहेत. धरणाच्या खालचा भाग तुटून धरण फुटण्याची भिती असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या दुरुस्तीसाठी मंजुरी घेतलेली असल्याचेही आमदार खडसे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.