सुरेखा पाटील यांना मिळाले भारत सरकार चे पेटंट
सुरेखा पाटील यांना मिळाले भारत सरकार चे पेटंट
लेवाजगत न्यूज सावदा-वराडसिम( ता. भुसावळ) येथील रहिवासी डिगंबर त्र्यंबक भारंबे यांची कन्या व सुनसगाव येथील जगन्नाथ पाटील यांच्या स्नुषा सुरेखा मनोज पाटील यांना भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे.
सुरेखा पाटील ह्या वराडसिम येथील पंडित नेहरू विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांना 'लेड लेअर्ड प्लेट मशीन'साठी हे पेटंट मिळाले. ज्यामुळे एलइडी लाईट अन्न घटकात स्प्रेड केल्यानंतर त्यातील विषारी घटक जे शरीराला अपायकारक असतात त्यांची टक्केवारी कळेल. या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत