Header Ads

Header ADS

धर्मशाळेची इमारत शादी हॉलसाठी द्या सावदा येथील मोठा आखाडा परिसरातून मागणी

Dharamshala's-Building-Wedding-Hall-Give-a-large-Akhara-Demand-from-the-Area


धर्मशाळेची इमारत शादी हॉलसाठी द्या सावदा येथील मोठा आखाडा परिसरातून मागणी

लेवाजगत न्यूज सावदा-मोठा आखाडा धर्मशाळेची इमारत शादी हॉलसाठी मिळावी, अशी मागणी अक्रम खान बालू खान व मोठा आखाडा परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Dharamshala's-Building-Wedding-Hall-Give-a-large-Akhara-Demand-from-the-Area


   पालिकेकडील मोठा आखाडा येथील धर्मशाळा या नावाने असलेली इमारत मुस्लिम समाजासाठी शादी हॉल म्हणून मिळावी. शादी हॉल हा सामाजिक व सांस्कृतिक कामासाठी आवश्यक आहे. सध्या या भागात कोणतीही व्यवस्था नसल्याने गैरसोय होते. तीदूर करण्यासाठी धर्मशाळेची इमारत मिळावी अशी मागणी माजी नगरसेवक फिरोज खान हबीबुल्लाह खान पठाण व अक्रम खान बालू खान यांचेसह ४० नागरिकांनी पालिकेत केली.

     यासाठी त्यांनी कार्यालय प्रमुख सचिन चोळके यांना निवेदन दिले. निवेदनावर सबीर अक्रम, युसूफ खान, शेख मेहताब, परवेज खान फिरोज खान, अक्रम खान, गुलाम खान, हाजी अख्तर, सय्यद याकुब, अलीयार खान, शब्बीर टायरवाले, शेख इरफान यांचेसह ४० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या बाबत अजून निर्णय झालेला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.