Header Ads

Header ADS

सावदा पालिका कर्मचाऱ्यांनी काढली तापी नदीतील बेशरमी, कर्मचाऱ्यांची मेहनत, पाणीपुरवठ्यातील अडचणी सुटणार

 

Savada-municipal-employees-removed tapi-in-the-river shamelessness,-employees-hard work,-difficulties in water supply-will be solved

सावदा पालिका कर्मचाऱ्यांनी काढली तापी नदीतील बेशरमी, कर्मचाऱ्यांची मेहनत, पाणीपुरवठ्यातील अडचणी सुटणार 

लेवाजगत न्यूज सावदा -शहराला हतनूर धरणाच्या बँक वॉटरमधील मांगलवाडी गावाजवळील तापी पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सतत पाण्यामुळे या भागात वेगवेगळ्या झाडाझुडपांसह बेशरमी वाढते. यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरून बेशरमी जोखमीने काढून बाहेर फेकली. सावदा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी. १२ किलोमीटर  अंतरावरील मांगलवाडी गावाजवळील तापी नदी पात्रात जॅकवेल तयार केली आहे. जलाशयातील पाण्याची उचल करून पाइपलाइनद्वारे रॉ वॉटर सावदा येथे आणून शुद्ध केले जाते. नंतर त्याचा शहरात पुरवठा होतो. 

Savada-municipal-employees-removed tapi-in-the-river shamelessness,-employees-hard work,-difficulties in water supply-will be solved


मात्र, जलाशयातील ज्या भागातून हे पाणी उचलले जाते तेथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी, बेशरमी वनस्पतीची वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता होती. त्यामुळे सावदा पालिकेचे अविनाश पाटील, प्रवीण महाजन, विकास भंगाळे, सागर वाणी, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, पृथ्वी भंगाळे, बापू नेमाडे, राहुल तायडे, चेतन चौधरी, साहिल चौधरी, चेतन बोंडे या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी खोल पाण्यात उतरून जलपर्णी आणि बेशरमी बाहेर काढण्याचे जोखमीचे काम हाती घेतले. गेल्या तीन दिवसांपासून हे काम सुरू आहे. यामुळे संभाव्य अडचणी सुटतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.