मोबाईलवर फायर फ्री आणि पबजीसारखे ऑनलाईन गेम खेळल्यानं १४ वर्षीय मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं
मोबाईलवर फायर फ्री आणि पबजीसारखे ऑनलाईन गेम खेळल्यानं १४ वर्षीय मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं
लेवाजगत न्युज जयपूर: मोबाईलवर फायर फ्री आणि पबजीसारखे ऑनलाईन गेम खेळल्यानं १४ वर्षीय मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तो दररोज १५ पेक्षा अधिक तास गेम खेळायचा. घटना राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील आहे. मुलगा सातवीत शिकत असून गेल्या ७ महिन्यांपासून त्याला मोबाईल गेमिंगचं व्यसन लागलं आहे. त्यामुळे अभ्यासावरुन त्याचं लक्ष उडालं आहे. मुलाची मानसिक स्थिती ढासळल्यानं कुटुंबानं दिव्यांग संस्थेत त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.
अलवर शहरातील मुंगस्का वसाहतीत राहणाऱ्या मुलाला मोबाईलचं व्यसन जडलं आहे. तो मोबाईलवर सतत फ्री फायर आणि पब्जी सारखे गेम खेळतो. त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. आता त्याच्यावर दिव्यांग संस्थेत उपचार सुरू आहेत. त्याला संस्थेत दाखल करण्यात आलं आहे. त्याला बांधून ठेवावं लागत आहे. कारण तो वारंवार पब्जी खेळण्याचा हट्ट करतो.
सध्या कुटुंबानं त्याला १५ दिवसांसाठी दिव्यांग संस्थेच्या वसतिगृहात दाखल केलं आहे. तिथे समुपदेशक त्याची मदत करत आहेत. समुपदेशक आणि डॉक्टरांचं पथक त्याची मानसिक स्थिती सुधारावी यासाठी काम करत आहे. मुलाची आई आसपासच्या घरांमध्ये धुणीभांडी करते, तर वडील रिक्षा चालवतात. त्यांनी सात महिन्यांपूर्वी मुलाला स्मार्टफोन घेऊन दिला. जानेवारी २०२३ पासून मुलानं घराबाहेर पडणं बंद केलं. आई, वडील कामावर गेल्यानंतर तो एकटाच घरी असायचा. तो सलग १४ ते १५ दिवस तास मोबाईलवर फ्री फायर, पब्जी खेळायचा.
रात्रीच्या वेळी मुलगा अंगावर चादर ओढून घ्यायचा आणि आत ऑनलाईन गेम खेळायचा. मुलगा मोबाईलचा वापर ऑनलाऊन क्लाससाठी करेल, असं कुटुंबियांना वाटत होतं. मात्र मुलगा सतत गेम खेळू लागला. हातात फोन नसल्यास मुलगा अन्नपाणी सोडून फायर फायर ओरडतो. त्याच्या हातांची बोटं कायम चालत असतात. मोबाईलवर खेळत असताना ज्याप्रकारे बोटांची हालचाल होते, तशीच हालचाल त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतल्यावर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत