Header Ads

Header ADS

चाकूचा धाक दाखवून युवतीवर गॅंग रेप आठ आरोपींवर गुन्हा दाखल

Gang-rape-of-girl-at-knife-case-charged-against-eight-accused


 चाकूचा धाक दाखवून युवतीवर गॅंग रेप आठ आरोपींवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था बुलढाणा-तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या युवतीवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना गुरुवारी दुपारी बुलडाणा तालुक्यातील राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ घडली. या प्रकरणी आठही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   या प्रकरणी ३५ वर्षीय युवकाने बोराखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली. हा युवक व त्याची नातेवाइक असलेली युवती असे दोघे खडकी येथे जात होते. राजूर घाटात देवीच्या मंदिराजवळ ते सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. तिथे आठ जण आले. त्यांनी फिर्यादीस मारहाण केली व चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशातील ४५ हजार रुपये हिसकावून घेतले. 

चाकूचा धाक दाखवून युवतीवर गॅंग रेप आठ आरोपींवर गुन्हा दाखल


   युवतीला बळजबरीने दरीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर युवकाने बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलिस ठाणे गाठून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.