Header Ads

Header ADS

रेल्वे विभागात प्रथम महिला डीआरएम : ईती पांडे उद्या स्वीकारणार पदभार


 रेल्वे विभागात प्रथम महिला डीआरएम : ईती पांडे उद्या स्वीकारणार पदभार

लेवाजगत न्युज भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या नूतन डीआरएम म्हणून मुंबई येथील ईती पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून मंगळवारी त्या पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. रेल्वे भुसावळ विभागात प्रथमच महिला अधिकाऱ्याची डीआएम म्हणून निवड करण्यात आली आहे.

डीआरएम पांडे धावपटू


भारतीय रेल्वेतील 35 डीआरएम यांच्या बदल्या रेल्वे बोर्डाकडून करण्यात आल्या असून त्यात भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस. केडीया यांचा समावेश आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वीच केडीया हे भुसावळ विभागात रूजू झाले होते. डीआरएम केडीया यांना अद्याप नियुक्तीचे ठिकाण मिळालेले नाही तर नूतन डीआरएम पांडे यांनी गत महिन्यात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मॅरेथॉन सहभाग घेऊन 88 किमी अंतर 11 तास 47 मिनिटात पार करून स्पर्धा जिंकली हेदेखील विशेष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.