न्हावी येथील प्रज्वल शंकर फिरके सह सहा ठार तीन जखमी,ठाणे येथे झालेल्या कंटेनर व काली पिली अपघातात मृत्यू
ठाणे येथे झालेल्या कंटेनर व काली पिली अपघातात न्हावी येथील प्रज्वल शंकर फिरके सह सहा ठार तीन जखमी
लेवाजगत न्यूज कल्याण-आज दिनांक १८/०७/२०२३ रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर एम एच ४८ टी ७५३२ व काळी पिवळी जीप एम एच ०४ ई १७७१ विद्यार्थी घेऊन पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. त्यामध्ये खालीलप्रमाणे जखमी व मयत झाले आहेत. सहा जण मृत्यू झाले असून तीन जखमी झाले.यात जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील रहिवाशी हल्ली मुक्काम पडघा प्रज्वल शंकर फिरके वय २२ हा विद्यार्थी मयत झाला असून न्हावी गावात शोककळा पसरली आहे.
या अपघातात चिन्मयी विकास शिंदे - वय १५ , रिया किशोर परदेशी , चैताली सुशांत पिंपळे - वय २७,संतोष अनंत जाधव - वय ५०,वसंत धर्मा जाधव - वय ५०, प्रज्वल शंकर फिरके वय २२ हे सहाजणांचा मृत्यू झाला असून दिलीप कुमार विश्वकर्मा वय २९,चेतना गणेश जसे वय १९ जखमी,कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय २२ जखमी असून त्यांना भिवंडी येथील मायरा हॉस्पिटल मध्ये जखमी रुग्णांवर उपचार चालु आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत