महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ च्या यावल तालुका अध्यक्षपदी पी के चौधरी,कार्यध्यक्ष संतोष बारी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ च्या यावल तालुका अध्यक्षपदी पी के चौधरी,कार्यध्यक्ष संतोष बारी
लेवाजगत न्यूज न्हावी तालुका यावल -महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पाल तालुका रावेर येथे गरीब होतकरू शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान झालेल्या पदाधिकारी मीटिंगमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे , खानदेश विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन यांच्या अध्यक्षतेखाली न्हावी येथील पी के चौधरी यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ च्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली , कार्याध्यक्षपदी संतोष बारी, तर सचिवपदी संजय बारी यांची निवड करण्यात आली , याप्रसंगी जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विनोद कोळी, के व्हि के प्रमुख महेश महाजन, यांच्या सहित रावेर व यावल तालुक्यातील पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत