सावदा शहरातील स्वामिनारायण मंदिरात सोमवती अमावास्येनिमित्त सायंकाळी सत्संग
सावदा शहरातील स्वामिनारायण मंदिरात सोमवती अमावास्येनिमित्त सायंकाळी सत्संग
लेवाजगत न्यूज सावदा- वडतालधाम द्विशताब्दी महोत्सवानिमित्त येथील श्री स्वामीनारायण मंदिरात सोमवती अमावस्येला शास्त्री स्वामी अनंत प्रकाशदासजी यांचा सत्संग होणार आहे. सावदा येथील सद्गुरू शास्त्री धर्मप्रसाददास, शास्त्री भक्तीप्रकाशदास, कोठारी शास्त्री भक्ती किशोरदास यांच्या प्रेरणेने गेल्या दोन महिन्यापासून दर अमावस्येला श्री स्वामीनारायण मंदिरात सत्संगाचे आयोजन केले जाते.
या अमावस्येला सोमवारी सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान शास्त्री अनंतप्रकाशदासजी हे भाविकांसोबत धार्मिक संवाद साधतील. उपस्थितीचे आवाहन सावदा सत्संग समज,महिला मंडळ व मंदिर विश्वस्थ या आयोजकांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत