महिलेचा पाठलाग करून रिक्षाचालकाने काढली महिलेची छेड
महिलेचा पाठलाग करून रिक्षाचालकाने काढली महिलेची छेड
छत्रपती संभाजी नगर वृत्तसंस्था-रिक्षात बसलेल्या तरुणीची छेड काढल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारासह अॅक्टिव्हा मोपेडवर मैत्रिणीसोबत निघालेल्या महिलेचा पाठलाग करून तिला एसटी विभागीय कार्यालयाच्या परिसरात अडवून विनयभंग केला. हा प्रकार १३ जुलै रोजी मध्यरात्री घडला. इम्रान खान सलीम खान (३५, रा. आमखास मैदान मागे) असे अटकेतील रिक्षाचालकाचे नाव आहे.
रोजाबाग परिसरातील ३१ वर्षीय फिर्यादी मैत्रिणीसोबत अॅक्टिव्हा मोपेडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मध्यरात्री १:४५ वाजता बाबा पेट्रोल पंपाकडे जात होती. या वेळी जामा मशीद येथून रिक्षाचालक इम्रान व त्याचा सहकारी साजेद यांनी (एमएच २० डीसी २७५२) या दोघींचा पाठलाग करून रिक्षा आडवी लावून रिक्षात बस असे म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, महिलेचा विनयभंग करून अश्लील कृत्य केले. फिर्यादीने पोलिसांना फोन करते असे म्हणताच त्यांनी धूम ठोकली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी इम्रानला अटक केली. माझी बहीण कुठे जात आहे हे पाहायला गेलो होतो. मात्र, ती माझी बहीण नसल्याचे समजले. परंतु, त्या महिलेने कानशिलात मारल्याचे त्याने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत