कराचीत हिंदू मंदिरावर रॉकेट लॉंचर ने हल्ला,हिंदूंच्या घरावर अंदाधुंद गोळीबार
कराचीत हिंदू मंदिरावर रॉकेट लॉंचर ने हल्ला,हिंदूंच्या घरावर अंदाधुंद गोळीबार
विदेश वृत्तसंस्था-पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कशमोर येथे रविवारी सकाळी एका हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी मंदिर आणि परिसरातील हिंदू समाजाच्या घरांवरही अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले.
पाकिस्तानमधील हिंदू मंदिरात ४८ तासांत तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी शुक्रवारी रात्री कराचीमध्ये १५० वर्षे जुने हिंदू मंदिर पाडण्यात आले होते. रात्री मारी माता मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यावेळी परिसरात वीज नव्हती.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारच्या हल्ल्यावेळी मंदिर बंद होते, त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. हल्लेखोरांनी मंदिराशेजारी राहणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकांच्या घरांवरही हल्ला केला.
प्राथमिक तपासानुसार हल्लेखोर ८ ते ९ जण होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. बागडी समुदायाने आयोजित केलेल्या धार्मिक सेवांसाठी मंदिर दरवर्षी उघडले जाते, असे डॉनने वृत्त दिले आहे.
कराचीच्या लोकांनी सांगितले- शुक्रवारी रात्री काही लोकांनी बुलडोझर आणले आणि मारी माता मंदिराच्या बाहेरील भिंती आणि मुख्य दरवाजा वगळता संपूर्ण मंदिर आतून नष्ट केले. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, जेव्हा मंदिर पाडले जात होते, तेव्हा मंदिर नष्ट करणाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते.
मुखी चोहितराम रोडवर हे मारी माता मंदिर आहे. तेथून सोल्जर बाजार पोलिस स्टेशनही हाकेच्या अंतरावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिराची जमीन एका शॉपिंग प्लाझा प्रवर्तकाला ७ कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. त्यामुळेच मंदिर पाडण्यात आले. जून २०२२ मध्येही मारी माता मंदिरातील देवतांच्या मूर्ती फोडण्यात आल्या होत्या.
श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी राम नाथ यांनी सांगितले की, मरी मातेचे मंदिर १५० वर्षांपूर्वी सुमारे ४०० ते ५०० स्क्वेअर यार्डमध्ये बांधले गेले होते. जुना खजिना त्याच्या अंगणात गाडल्याच्या कथाही प्रसिद्ध आहेत.
मारी माता मंदिराचे व्यवस्थापन मद्रासी हिंदू समाजाकडे होते. ते म्हणतात की हे मंदिर खूप जुने होते आणि कधीही कोसळू शकते. त्यामुळेच आम्ही बहुतांश मूर्ती तात्पुरत्या स्वरूपात अन्य ठिकाणी हलवल्या होत्या. नवीन मंदिर बांधल्यानंतरच मूर्ती पुन्हा जागेवर ठेवल्या जातील, असे आम्हाला वाटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत