Contact Banner

फैजपूर शहरातील मोरे कुटूंबावर शोककळा,एकाच दिवशी आजी व नातवाची अंत्ययात्रा

फैजपूर शहरातील मोरे कुटूंबावर शोककळा,एकाच दिवशी आजी व नातवाची अंत्ययात्रा


फैजपूर शहरातील मोरे कुटूंबावर शोककळा,एकाच दिवशी आजी व नातवाची अंत्ययात्रा

लेवाजगत न्यूज फैजपूर- शहरातील लक्कड पेठ मधील सोन्या चांदीचे व्यापारी दत्तू मोरे व विष्णू मोरे यांचा (खिरोदा ता.रावेर येथे ज्वेलर्स चे दुकान आहे ) यांच्या आई   कमलाबाई कोंडू मोरे  या सात आठ दिवसापासून आजारी होत्या. त्या आपला मोठा मुलगा दत्तू मोरे यांच्याकडे होत्या. त्यांचे वय ८७ होते.  दुसरा मुलगा विष्णू कोंडू मोरे हा  गावातील भारंबे वाड्यामध्ये राहत होता. विकी मोरे हा रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या आजीजवळ होता. सोमवारी पहाटे चार वाजता  आजीची तब्येत जास्त असल्याने  नातू विकी मोरे हा आजीला पाहण्यासाठी पुन्हा आला. पाहण्यासाठी येतानाच पायरी वर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 

हेही वाचा-वॉकिंग करताना विश्रांतीसाठी विहिरीच्या कठड्यावर बसताना तोल गेल्याने ,कोरड्या विहिरीत पडल्यामुळे शिक्षकाचा मृत्यू  👇 

https://www.lewajagat.com/2023/07/Vokinga-karatana-vishrantisathi-vihirichya-kathadyavara-basatana-tola-gelyane-koradya-vihirita-padalyamule-shikshakacha-mrutyu.html

तिथे पायऱ्यावर खाली बसला. पहाटेची वेळ होती शेजारी खेमचंद वाघुळदे त्या ठिकाणी हजर होते. व पंकज मोरे यांच्या पत्नी  मेघा यांनी  गॅलरीतून आवाज दिला शेजारी राहणारे कुटुंब  खेमचंद वाघुळदे ,नीलम वाघुळदे व लोकेश वाघुळदे यांनी तात्काळ विकी मोरेला उचलले. लागलीच विकी मोरे याचे आई-वडील सुद्धा  लगेच आले. त्यांनी मिळून त्याला साडे चार वाजता  सावदा येथे दवाखान्यात घेऊन गेले. सावदा येथील डॉक्टरांनी लगेच त्याला भुसावळ नेण्यास सांगितले  येथून त्याला भुसावळ दवाखान्यात नेण्यात आले. भुसावळ येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ही घटना मंगळवार सकाळची सव्वा पाच वाजेची आहे. लगेच त्याला फैजपूरला आणण्यात आले. इकडे सहा वाजता आजी  चे निधन झाले.  विकी मोरे याला सकाळी साडेसहा वाजता घरी आणण्यात आले. त्यानंतर आजीला सात वाजता विष्णू मोरे यांच्याकडे  आजी व नातवाला ठेवण्यात आले. मंगळवार दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. अंतयात्रेत प्रथम आजी व नंतर नातू  अशी शोकयात्रा निघाली. कमलाबाई मोरे आजीला  मोठा मुलगा दत्त मोरे यांनी अग्नीडाग दिला. विकी मोरे याला  मोहक पंकज मोरे या सात वर्षीय बाळाने अग्नीडाग दिला. अशा रीतीने मोरे कुटुंबावर ही शोककळा पसरली आहे. शहरातील ही पहिलीच घटना आहे.

     विकी मोरे हा आयटीआय उत्तीर्ण झालेला होता. त्याने रेलवेत अप्रेंटिसशिप केलेली होती. वडिलांचा खिरोदा येथे  ज्वेलरी चा व्यवसाय असल्याने तो त्यांना हातभार लावत होता  त्यांच्या कुटुंबातील हा एकुलता एक मुलगा होता. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे. आणि शनिवारी त्याला पाहुणे पाहण्यासाठी येणार होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.