तरुणाचा वाहून गेलेला मृतदेह सुकी नदीच्या माकडदरी खोऱ्यात सापडला
तरुणाचा वाहून गेलेला मृतदेह सुकी नदीच्या माकडदरी खोऱ्यात सापडला
लेवाजगत न्यूज सावदा- २१ जुलैला सुकी नदीत वाहून गेलेल्या रोझोदा येथील तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी नदीपात्रात आढळला होता. मात्र, तो बाहेर काढण्यापूर्वीच पूर वाढल्याने वाहून गेलेला मृतदेह मंगळवारी सातपुड्यातील माकडदरी खोऱ्यात सुकी नदीत तरंगताना आढळला. यानंतर मृतदेह बाहेर काढून कायदेशीर प्रक्रिये नंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .
हेही वाचा-सुकी नदी पात्रात पोहायला गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह ४ दिवसांनी सापडला अन् पुन्हा गेला वाहून! 👇
रोझोदा तालुका रावेर येथील महेंद्र दगडू चौधरी (वय ३५) हा २१ जुलैला मित्रांसोबत गारबर्डी धरण परिसरात फिरायला गेला होता. तेथील सुकी नदी पात्रात पोहताना तो बेपत्ता झाला. पथकाने शोध घेऊनही तो सापडला नाही. दरम्यान, चौथ्या दिवशी सोमवारी (दि.२४) सकाळी १० वाजेच्या
सुमारास लोहारा परिसरातील सुकी नदी पात्रात महेंद्रचा मृतदेह काही आदिवासी बांधवांना नजरेस पडला. त्यांनी ही माहिती सरपंच लियाकत जमादार व त्यांनी सावदा पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांसह यंत्रणेने घटनास्थळी घाव घेतली. पण, मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यापूर्वीच वेगवान प्रवाहासोबत वाहून गेल्याची घटना घडली होती. सावदा पोलिस ठाण्याचे अधिकारी
तरुणाचा वाहून गेलेला मृतदेह माकडदरी खोऱ्यात सापडला प्रतिनिधी | सावदा कायदेशीर कर्मचारी या मृतदेहाचा शोध घेत होते. मंगळवारी चिंचाटी शिवारात माकडदरी खोऱ्यात सुकी नदीत हा मृतदेह तरंगताना आढळला. नंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. कायदेशीर बाबी पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. हेमराज भोळे यांच्या खबरीवरून मिसिंग दाखल आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत