मा. श्री श्याम पाटील जी संपादक, लेवा जगत, सावदा
मा. श्री श्याम पाटील जी
संपादक,
लेवा जगत, सावदा
सस्नेह नमस्कार
सर्चलाईट इंग्लिश स्कूल वढोदे प्र.सावदा येथे संपन्न झालेल्या विद्यार्थी आणि पत्रकारिता कार्यशाळेत आपण आपला ३५ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव
सांगितला. " सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना स्वतःच्या परिवाराला सुद्धा वेळ देता येत नाही. दिवसरात्र वृत्तसंकलन करताना पत्रकाराची वेळप्रसंगी बऱ्याचदा स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची तयारी असली पाहिजे. कोणत्याही पत्रकाराला आपला इतिहास, वर्तमानातील सामाजिक तशाच राजकीय घटनांची व येणाऱ्या भविष्यातील का अंदाजात्मक गोष्टींची जाण असायला पाहिजे.कोणत्याही पत्रकाराला स्वतःचा आणि समाजाचा अनुभव यांची सांगड घालून निस्वार्थ भावनेने नागरिकांसमोर चांगले वाईट अनुभव मांडता आले पाहिजे. कोणत्याही विषयावर लिहिताना त्या विषयाची सखोल माहिती असायला हवी आणि ती नसेल तर त्या विषयाची माहिती घेण्याची जिज्ञासा असली पाहिजे. आजच्या काळात पत्रकारितेला फार महत्त्वप्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी या विषयाकडे करियर म्हणून पाहिले पाहिजे " हा आपल्या भाषणाचा वृत्तांत वाचून आणि आपले विचार व कार्य पाहून आपले अभिनंदन करावे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात म्हणून हा प्रपंच केला आहे. शुभंभवतु.
स्नेहांकित,
--प्रा.डाॅ.राम नेमाडे, डोंबिवली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत