आक्रोश जनशक्ती संघटना आणि पूरग्रस्त नागरिकांचा तहसील कार्यालयावर लक्ष्यवेधी मोर्चा
आक्रोश जनशक्ती संघटना आणि पूरग्रस्त नागरिकांचा तहसील कार्यालयावर लक्ष्यवेधी मोर्चा
आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांच्या नेतृत्वात असंख्य पूरग्रस्त नागरिक आपल्या हक्कासाठी शासन दरबारात
लेवाजगत न्युज वरुड:- मागिल वर्षी आजच्याच म्हणजेच 7 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 9 वाजता च्या दरम्यान वरुड शहरात अतिशय मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. त्यामध्ये वरुड तालुक्यात व शहरात सर्वत्र कहर मचला होता त्यामध्ये अनेक नागरिक आपल्या घरापासून व संपूर्ण घरातील साहित्यापासून वंचित झाले होते. व कोण्याच्या घरातील काम करते घरातील कमावता जीव जिवाने गेले कोणी अनाथ झाले काही लहान मुल अनाथ झाले अनेक नागरिक बेघर झाले होते.
त्या पुरग्रस्त नागरिकांना कसेबसे अंग झटकत जबाबदारी होती म्हणून प्रशासनाने काही दिवस निवारा म्हणून या पूरग्रस्तांना शाळेच्या व शासकीय सभागृहात ठेवण्यात आले पण त्यांच्याकडे जी जागा होती.
ती नगरपरिषद हद्दची नसल्यामुळे शाळेतून सुद्धा तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून कसे बसे दिवस काढून टाकले पण प्रशासन पूरग्रस्तांनची कुठलीच व्यवस्था करताना दिसल्या नसल्यामुळे व दिवसाने दिवस परिवारातील लोकांचे हाल अपेष्टा सहन करत पूरग्रस्त जगत आहेत.
ज्या ज्या भागात पुराचे पाणी आले होते. तिथे छोट्या-मोठ्या झोपड्या पुन्हा उभारण्याचे प्रयत्न केले व कोणी भाड्याने राहायला गेले पण प्रशासनाने कुठलीच व्यवस्था करून दिली नव्हती म्हणून ना इलाजास्त जिव मुठीत धरून लहान मुलाबाळांना त्याच ठिकाणी झोपड्या बांधून राहावं लागतं आहे. म्हणून आज मागिल वर्षी 7 ऑगस्ट 2022 चा पूर आठवत एक वर्ष झाले पण शासनाने अजूनही यावर लक्ष दिले नाही म्हणून आज आक्रोश जनशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष सुशील बेले यांच्या नेतृत्वात पूरग्रस्तांन सोबत लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
यामध्ये प्रमुख मागण्या घेऊन पूरग्रस्तांना पुनर्वसन कुठे आणि केव्हा होणार ,पूरग्रस्तांना प्रमाणपत्र कधी मिळणार , चुडामन नदीचे पाणी ज्या भागातून शहरात शिरते त्या ठिकाणी संरक्षण भिंत आणि पूल कधी बांधणार व झालेल्या पूरग्रस्तांमध्ये नुकसान भरपाई कधी मिळणार या सर्व मागण्या घेऊन आज ता. 7 ऑगस्ट 2023 ला तहसील कार्यालय येथे लक्षवेधी आक्रोश मोर्चा सुरू करण्यात आला याचा मार्ग वरुड येथील खडक पेंड वस्तीतून मिरची प्लॉट सिंख समुदाय वस्ती केदारेश्वर परिसर व केदार चौक पाढुर्णा चौक मार्ग तहसील कार्यालयावर धडकला यामध्ये हजारो पूरग्रस्त नागरिक सहभागी झाले होते या नागरिकांना न्याय भेटावा म्हणून तहसील कार्यालय समोर लेखी पत्र जो पर्यंत मिळाले नाही तोपर्यंत संपूर्ण पूरग्रस्त नागरिक तहसील कार्यालयासमोर सुशील बेले व संपूर्ण पूरग्रस्त नागरिक बसले होते. व त्यावेळेस तहसीलदार साहेब यांनी पूरग्रस्तांशी चर्चा करतांना सांगितले की वरुड शहरातील पुनर्वसन साठी अमरावती रोड येथील सरकारी धान्याची गोडाऊनच्या मागे करण्यात येणार याचे प्रस्ताव व पाहणी करून आम्ही जिल्हाधिकारी यांचेकडे अधिग्रहण करण्याचे पत्र दिले आहे.
असे लेखी स्वरूपाचे पत्र आम्हाला दिले व चुडामण नदीच्या ज्या ठिकाणाहून पाणी आत शिरते त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यासाठी मुख्याधिकारी यांनी पाटबंधारे विभागाला शासन प्रस्ताव सादर केला आहे. या सर्व मागण्या तहसीलदार साहेबांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्या त्यावेळेस उपस्थित सर्व पुरग्रस्त नागरिक व आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले व पदाधिकारी यांनी हा मोर्चा मागे घेतला.
यावेळी उपस्थित आक्रोश जनशक्ती संघटना चे कार्यकर्ते ,पदाधिकारी, उपस्थित योगेश बिसान्दे , उमेश धोटे , ताहीर खान , छगन धोटे ' गजानन मोहपे , अब्दुल जफीर , शेख समीर , शेख जावेद , दारा ठाकरे , अनिल जावरकर , नाना धोटे , आकाश वाघमारे , शेख सिराज , विक्की दुर्गे , कृणाल बेसरे , शंकर उयके , नंदु भोपा , व असंख्य वरुड तालुक्यातील पूरग्रस्त नागरीक हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत