Header Ads

Header ADS

रावेर विधानसभेतून अपक्ष लढणार -श्रीराम पाटील

  

Raver-Sriram-Patil-will-fight-independent-from-Vidhansabha

रावेर विधानसभेतून अपक्ष लढणार -श्रीराम पाटील

लेवा जगत न्यूज रावेर- रावेर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी समविचारी पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा २०२४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

Raver-Sriram-Patil-will-fight-independent-from-Vidhansabha


पाटील यांनी गुरुवारी मॅक्रो विजन अकॅडमी स्कूलमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रावेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. राज्यकारणात मोठे होण्यासाठी नव्हे तर समाजसेवा करण्यासाठी मैदानात उतरू, गेल्या पंचवार्षिक मध्ये निवडणूक लढवण्याची संधी हुकली पण येणाऱ्या निवडणुकीत समाविचारी पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवू असे त्यांनी सांगितले. दर्जी फौंडेशनचे गोपाळ दर्जे, रवींद्र चौधरी, विजय गोटीवाले, एडवोकेट प्रवीण पाचपोहे ,स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील, सोपान पाटील यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.