Header Ads

Header ADS

निस्सीम साईभक्त शालिनीताई घरत यांचे दुःखद निधन,साई भक्तांची माऊली बायजामाई कालाआड हरवली

Nisseem-Sai-Bhakta-Shalinitai- Family-Sadly-Deceased-Sai- Devotees-Mauli-Baijamai- Forever-Lost


निस्सीम साईभक्त शालिनीताई घरत यांचे दुःखद निधन,साई भक्तांची माऊली बायजामाई कालाआड हरवली

उरण (लेवाजगत प्रतिनिधी सुनिल ठाकूर )उरण नवीनशेवा गावातील निस्सीम साईभक्त तसेच सर्वांच्या माऊली बायजामाई , शिर्डी साईबाबांच्या पालख्यांना व आळंदी दिंड्यांना अन्नदान करणाऱ्या नवीनशेवा उरण ते प्रती शिर्डी शिरगाव पुणे महिला सह पालखी दिंडी पदयात्रा जाणाऱ्या मंडळाच्या संस्थापक संचालिका शालिनीताई रामचंद्र घरत यांचं गुरुवारी  १९ तारखेला दुःखद निधन झालं आहे.






  शालिनीताई यांची अंत्यविधी गुरुवारी १९ तारखेला दुपारी  नवीनशेवा गावातील स्मशानभूमीत झाली.

साईभक्त शालिनीताई यांच्या मागे त्यांचे पती,२ मुले, १ मुलगी आणि ४ नातवंडे अशा परिवारासह असंख्य साई-भक्तांवर   दुःखाचा डोंगर सोडून गेल्या आहेत. त्या विविध समाजकार्यात सक्रिय होत्या.

तसेच त्या उत्कृष्ट व्यावसायिका असल्यामुळे त्यांना JNPT मध्ये बेस्ट बिझनेस उमेन  हा पुरस्कार मिळाला होता .तसेच आगरी कोळी महोत्सव मध्ये त्यांच्या धार्मिक क्षेत्रात निस्वाथीॅपणे उल्लेखनीय कार्य करून समाजाची निरपेक्ष सेवा केल्याबद्दल उत्कृष्ट गौरव पुरस्कार मिळाला होता.

शालिनीताई यांची दशक्रिया शनिवारी  २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८  वाजता श्री क्षेत्र माणकेश्वर उरण येथे होणार आहे, तसेच त्यांचे उत्तरकार्य विधी मंगलवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नवीनशेवा  येथे राहत्या घरी होणार आहे.

शालिनीताई यांचा चांगला स्वभाव आणि साई भक्तीने जोडलेला साई भक्तांचा मेळावा त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या दुःखी कुटुंबीयांच्या परिवारात  सहभागी होऊन.हलहल व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.