नाहाटा महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी लेवा गणबोली दिन म्हणून साजरी
नाहाटा महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी लेवा गणबोली दिन म्हणून साजरी
लेवाजगत न्यूज भुसावळ -येथील कला, विज्ञान, आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी लेवा गणबोली दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ. बी. एच. बऱ्हाटे हे होते. त्यांच्यासमवेत रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर, प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. हर्षल पाटील, श्री. सचिन पाटील, डॉ. सचिन कोलते, श्री. विनय चौधरी इतर प्राध्यापक बंधू-भगिनी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आर. एस. नाडेकर यांनी सादर केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी लेवा गणबोली दिन म्हणून साजरा करण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता, जात्यावरच्या ओव्या, अहिराणी गाणी यावर प्रकाश टाकला.
"मन जहेरी जहेरी,न्यार त्याचं रे तंतर,
इचू साप बरा, त्याले उतारे मंतर"
यातून बहिणाबाईंनी मनाची व्याख्या स्पष्ट केली आहे.
तसेच संसाराचा गोडवा गातांना त्या म्हणतात
"अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके तवा मिळते भाकर."
अशा पद्धतीने कवयित्री बहिणाबाईंच्या कवितांवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगत स्पष्ट करताना उपप्राचार्य प्रा. डॉ. बी.एच. बऱ्हाटे यांनी बहिणाबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्याने त्यांच्या कार्याचा गौरव केल्याचे म्हटले. जात्यावरच्या ओव्यांमधून त्यांनी मानवी जीवनाचा सार सांगितला. व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना येणाऱ्या समस्यांना कसे हसतमुखाने तोंड द्यावे हे स्पष्ट केले. निसर्ग कन्या, खानदेश कन्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
त्यानंतर आभार प्रदर्शन प्रा.हर्षल पाटिल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात राष्ट्रिय सेवा योजनेचे स्वयंसेवक चेतन चौधरी, पुरुषोत्तम, गंगा ढाके, गौरी ढाके इ. उपस्थित होते. तसेच इतर प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत