सावदा येथील डायमंड स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केले प्रकल्प
सावदा येथील डायमंड स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केले प्रकल्प
लेवाजगत न्यूज सावदा-येथील डायमंड स्कूलमध्ये गुरुवारी इयत्ता ६वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन शाळेचे अध्यक्ष डॉ. हाजी हारून यांच्या सूचनेनुसार घेण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वैज्ञानिक प्रकल्प साकारले होते. या विज्ञान प्रदर्शनात प्रदूषण नियंत्रण तसेच सौरऊर्जा व सोलर सिस्टिमच्या माध्यमातून आपल्या देशाला कसा फायदा होईल असे विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रोजेक्ट तयार केले. भुसावळ येथील विज्ञान तज्ज्ञ अविनाश मोरे यांनी फित कापून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी कुराण शरीफची आयात पठण करून कार्यक्रमाची सुरवात केली. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष डॉ. हाजी हारून शेख, नाजिम शेख, संचालक प्रा. मोहसिन, सुपरवायझर फारुकी समन, शाळेचे प्रिन्सिपल सेहरा सरोटा उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहसीन खान यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत